नवी मुंबई - जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सत्यमेव जयते ट्रस्टचे कार्य महाराष्ट्र राज्यात वेगाने सुरु असून त्या कार्यात अजून वेग यावा यासाठी नुकत्याच काही राज्यस्तरीय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.त्यात नवी मुंबईतील जितेंद्र अशोक हुले या युवकाला प्राधान्य देण्यात आले असून त्याची महाराष्ट्र राज्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.कार्यकारिणी मंडळाच्या आदेशाने राज्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आले असल्याचे पत्र ट्रस्टचे अध्यक्ष संजय पवार यांच्याकडून प्रदान करण्यात आले आहे.
जितेंद्र हुले राजकीय सह सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असून नवी मुंबई शहरात त्यांच्या कार्याचा दबदबा आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सत्यमेव जयते ट्रस्टचे अध्यक्ष संजय पवार यांनी थेट त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सचिव पदावर केली आहे.त्यांच्या या नियुक्तीने ट्रस्टचे कार्य अधिक बळकट होणार असून मी माझ्या सहकाऱ्यांसमवेत ट्रस्ट वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे हुले यांनी सांगितले.त्याचबरोबर लवकरच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तरुणांना या ट्रस्ट मध्ये नव्याने काम करण्यासाठी संधीही देण्यात येईल असा विश्वासही हुले यांनी व्यक्त केला.
सत्यमेव जयते ट्रस्टच्या राज्य सचिव पदी जितेंद्र हुले यांची निवड