लॉकडाऊनला वैतागून इंजिनिअर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

लॉकडाऊनला वैतागून इंजिनिअर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


नवी मुंबई -  वाढते लॉकडाऊन आणि त्यातल्या त्यात सर्व परिवार गावी अश्या पेचात अडकलेल्या एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी कोपरखैरणे परिसरात घडली.या प्रकरणाची कोपरखैरणे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून मयत तरुणाने नेमकी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली आहे याचा पोलीस तपास करत आहेत.सूरज सर्वे (२७) असे आत्महत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 
              सुरज कोपरखैरणेत भाऊ आणि वहिनीसोबत रहायला होता.लॉकडाऊन सुरु झाल्यापासून घरातील सर्वजण गावीच अडकले होते त्यामुळे तो घरात   एकटाच अडकला होता.तो इंजिनियर असून ऐरोलीतील एका कंपनीत नोकरीला होता.मंगळवारी दुपारी कोपरखैरणे सेक्टर 4 येथील राहत्या घरात आत्महत्या केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.मंगळवारी दुपारी त्याच परिसरात राहणारी व्यक्ती सुरजसाठी जेवण घेऊन घरी गेली होती. परंतु त्याने दरवाजा न उघडल्याने पोलिसांना सदर बाब कळवण्यात आली.पोलिसांनी तत्काळ या प्रकरणी धाव घेतली आणि प्रथम दरवाजा तोडला.त्यावेळी आतमध्ये सुरजने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. तसेच आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिट्टी देखील त्या ठिकाणी आढळून आली. त्यामध्ये लॉकडाऊनला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. लॉकडाऊन मुळे घरी एकटाच असल्याने घर खायला उठत आहे. घरच्यांची सतत आठवण येते परंतु भेट होऊ शकत नाही. तर लॉकडाऊन अजून किती वाढेल त्याचीही खात्री नाही. यामुळे आत्महत्या करत असल्याचे चिट्टीत म्हटले आहे.याप्रकरणी कोपर खैरणे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.तर पुढील तपासाला सुरवात केली आहे. 


 


Popular posts
अगोदर नोटीस, मग कारवाई, नंतर सेटलमेंट, इमारत पुन्हा उभी ? , तुर्भे विभाग कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात ? , तुर्भे विभाग अधिकारी व सिडको अधिकारी यांच्या भूमिकेवर संशय ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे दोन महिन्यात दोन मजले उभे ? , दोनदा कारवाई नंतर १५ लाख घेऊन बांधकामाला परवानगी दिल्याची चर्चा ? , दिवाळी अगोदर दोन मजले पूर्ण करण्याचे आदेश कोणाचे, सिडको चे मनपाचे ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image
अनधिकृत लॉजिंगमुळे शिरवणे गावाचे अस्तित्व धोक्यात, गावातील लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये वेश्याव्यवसाय, राहत्या इमारती मध्ये लॉजिंगचे अनधिकृत बांधकाम,अतिक्रमण विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?
Image
कोकणातील गणेशोत्सवावर कोरोनाच्या मर्यादा - राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना
Image