लॉकडाऊन नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा,तर हजारो वाहने जप्त
नवी मुंबई - वारंवार आव्हान करूनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर अखेर नवी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला आहे.गेल्या १० दिवसांच्या लॉकडाऊन काळात पोलिसांनी तब्बल हजारो जणांवर कारवाया केल्या आहेत तर विनाकारण वाहने घेऊन घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या वाहनांवरही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.कारवाई करण्यात आलेल्या नागरिकांवर प्रचलित कायद्यानुसार दखलपात्र तसेच अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लॉकडाऊन काळात विनाकारण वाहने घेऊन बाहेर फिरणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करत तब्बल ११२० जणांना पोलिसांनी दणका दिला आहे.त्यांच्यावर गुन्हे दाखल पोलिसांनी वाहनेही जप्त केली आहेत.मॉर्निग व इव्हिनिंग वॊक करणाऱ्या ३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्या तब्बल ४५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.सामाजिक अंतर न पाळणाऱ्या ५६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.सामाजिक अंतर व इतर आरोग्यविषयक खबरदारी न घेता आस्थापना चालू ठेवणाऱ्या १३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.भादंवि कलम १८८ नुसार ९७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्या १४ जणांवर कारवाई करण्यात आली आहेआस्थापना विहित वेळेत बंद न केल्याबाबत ४ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.याखेरीच लॉकडाऊन काळात एकूण पोलिसांनी ३१०३ वाहने जप्त करत त्यांच्यावर कारवाई केली आहे.
लॉकडाऊन नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा,तर हजारो वाहने जप्त