नवी मुंबई - इंटरनेटच्या जगात बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन होत असल्याने यांचा गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार विविध प्रकारच्या गुन्हेगारी कार्यपदध्तीचा वापर करत आहेत.यामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असून अनेक सायबर गुन्हे घडत आहेत.चालू वर्षात आतापर्यन्त अशाप्रकारचे २४ गुन्हे दाखल झाले असून payTM KYC अपडेटसाठी येणाऱ्या फेक मेसेज किंवा कॉल्स तपासून घ्या असे आव्हान नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
payTM KYC किंवा Bank Debit card ,Credit card updet करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारी व्यक्ती या टेक्कट किंवा व्हाट्सअप मेसेज पाठवतात किंवा कॉल करतात.त्यांनतर प्राप्त झालेल्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलेल्या मोबाईल नंबरवर आपण फोन करता किंवा paytm /bank मधून बोलत असल्याचे भासवून गुन्हेगार आपल्याशी संपर्क करतात.संपर्क झाल्यावर आपल्याला link किंवा qr कोड किंवा रिमोट ऍक्सेस ऍप किंवा paytm चा व्हेरिफिकेशन कोड अशा चार प्रकारे आपली आर्थिक फसवणूक करतात.मैसेजमधील लिंक ओपन केल्यानंतर आपल्याकडून upi pin व बँक अकाउंट डिटेल्स व पासवर्ड ही माहिती भरली जाते.upi pin बँक अकाउंट डिटेल्स व पासवर्ड दिल्यामुळे आपल्या बँक खात्यातून पैसे डेबिट होतात.QR code scan केल्यामुळे त्यामध्ये डेबिट करावयाची रक्कम गुन्हेगाराने अगोदरच सेट केलेली असते.त्यामुळे आपण QR code scan करताच आपल्या बँक खात्यातून पैसे तत्काळ डेबिट होतात.व्हाट्सअप मेसेज करून आपल्याला Any desk ,Quick support ,Team viwer अशा प्रकारचे App ची लिंक पाठवून ते डाउनलोड करण्यास सांगतात.आपण असे ऍप डाउनलोड करून त्यांचा कोड दिल्यानंतर आपल्या मोबाईलचा पूर्ण Remote Access घेऊन गुन्हेगार आपल्या बँक खात्यातील सर्व रक्कम काढून घेतात.काही वेळा फसवणूक करणारी व्यक्ती आपले paytm चा व्हेरिफिकेशन कोड आपलेकडून घेऊन paytm वॅलेटवर घेऊन वॅलेटचा दुरुपयोग करतात.त्यामुळे सतर्क राहण्याची गरज असून आपल्याला कशी प्रकारची खबरदारी घेता येईल याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी जाहीर केली आहे.यात paytm/bank वरील कारणांसाठी फोन किंवा sms न करणे, पाठवलेल्या लिंक वर क्लीक करू नये, पाठवलेल्या QR code ला scan करू नये.वरील प्रमाणे कोणतेही मोबाईल ऍप ला डाउनलोड करू नये,आपली कोणतीच माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये,पैसे घेण्यासाठी upi pin देण्याची किंवा QR code scan करण्याची आवश्यकता नसते अशी माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे.