कायम, कंत्राटी तसेच ठोक मानधनावरील कामगारांच्या समस्या मार्गी लावण्याचे मनपा आयुक्तांचे आश्वासन


नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या कायम, कंत्राटी तसेच ठोक मानधनावरील कामगार व अधिकाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांच्या मागण्यांबाबत कामगारांचे शिष्टमंडळ नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना भेटले असता त्यांनी कामगारांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन सावंत यांना दिले.या बैठकीत पालिका आयुक्त बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना कामगारांच्या समस्या यापुढे प्रलंबित राहणार नसल्याचे आश्वासन दिले. सावंत यांनी आज प्रत्येक संवर्गातील एक कामगार शिष्टमंडळात घेवून पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेवून चर्चेदरम्यान निवेदन सादर  केले. त्या निवेदनातील समस्यांवर चर्चा करताना रवींद्र सावंत यांनी कामगारांच्या समस्या सोडविताना प्रशासनाकडून होत असलेली चालढकल व दाखविली जाणारी उदासिनता पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.
               महापालिका प्रशासनातील समाजविकास विभागात समूह संघठक कार्यरत आहेत. नियमाप्रमाणे त्यांची प्रशासनाने काही वर्षापूर्वी (१० वर्षाहून अधिक) भरती केलेली आहे.या कर्मचाऱ्यांची आजतागायत सेवा कायम केलेली नाही.त्यांची सेवा कायम करण्यात यावी.पालिका प्रशासनामध्ये १० ते १२ वर्षापूर्वी आरसीएच संवर्गातील कामगारांची एम्पलॉयमेंटच्या माध्यमातून नियमाप्रमाणे भरती झालेली आहे. ठोक मानधनावरच ते आजही काम करत आहेत. अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या संवर्गातील कामगारांची सेवा कायम झालेली आहे. केवळ आपल्याच महापालिकेत अद्यापि यांची सेवा कायम झालेली नाही. या कामगारांची सेवा  लवकरात लवकर कायम करणे आवश्यक आहे.ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यात यावे. कोरोना काळ आहे. ते आजारी पडल्यास त्यांचा सर्व वैद्यकीय खर्च महापालिका प्रशासनाने करणे आवश्यक आहे. ई एल व सीएल या कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने देणे आवश्यक आहे. नागरी आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दररोज आठ तास काम करूनही दुसरा व  चौथा शनिवार रजा  भेटत नाही, यावरही निर्णय होणे आवश्यक  आहे.पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागात मिडवाईफ, स्टाफ नर्स यांना ठोक मानधनावर २० हजार रूपये मासिक वेतनावर काम करावे लागत आहे. पालिका प्रशासनात याच संवर्गात नव्याने भरती झालेल्या परिचारिकांना ४० हजार रूपये वेतन देत आहे. प्रत्यक्ष वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांना २० हजार व नव्याने भरती झालेल्यांना ४० हजार रूपये. संबधित ठोक मानधनावर काम करणाऱ्या मिडवाईफ व स्टाफ नर्स यांना ४० हजार रूपये मासिक वेतन सुरू करण्यात यावे.कोविड काळात प्रशासनातील बहूउद्देशीय कामगार घरोघरी जावून कोरोना तपासणी कार्य करत आहे. कोरोना रूग्णांचा शोध घेत आहेत. कोरोनाबाबत जनजागृती करत आहेत.प्रशासनातील एएनएम व मिडवाईफच्या धर्तीवर या बहूउद्देशीय कामगारांना वेतन देण्यात यावे.त्यांना काही काळापूर्वीच कुशल कामगार म्हणून प्रशासनाने पदोन्नती दिली असली तरी वेतनातील फरक अजून देण्यात आलेला नाही. प्रशासनाने या कामगारांना वेतनातील फरक द्यावा.पालिका प्रशासनात अनेक वर्षापासून औषध निर्माता (फॉर्मासिस्ट ) ठोक मानधनावर काम करत आहे. प्रशासन त्यांना अवघे १८ हजार ५०० रूपये मासिक वेतन देत आहे. आता नव्याने भरती केलेल्या औषध निर्मात्यांना (फॉर्मासिस्ट) मासिक वेतन ३० हजार रूपये वेतन देण्यात येत आहे. वेतनातील दुजाभाव कशासाठी? जुन्यांचे वेतनात शोषण व नव्यांना भरघोस वेतनाचे प्रमोशन हा काय प्रकार आहे. जुन्या अनुभवी औषध निर्मात्यांना नव्याने भरती झालेल्या औषध निर्मात्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे. त्यांची सेवा पालिका प्रशासनाने कायम करावी.पालिका प्रशासनात २४ वर्षे सेवा झालेले स्वच्छता निरीक्षक व १२ वर्षे सेवा झालेले उपस्वच्छता निरीक्षक यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी. उपस्वच्छता  निरीक्षकांना स्वच्छता निरीक्षकांचे वेतन लागू करण्यात यावे आणि स्वच्छता निरीक्षकांना  वरची वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.पालिका प्रशासनात कार्यरत असणाऱ्या सर्व संवर्गातील डॉक्टर व इतर अधिकाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ तात्काळ देण्यात यावा.पालिका आस्थापनेवरील कर्मचारी व अधिकाऱ्यांना आपल्या आजारावरील उपचाराच्या बिलाची रक्कम मिळविण्यासाठी पालिका  प्रशासनातील आरोग्य विभागात हेलपाटे मारावे लागतात. कधी वर्षाहून अधिक कालावधीही जातो. त्यामुळे हे प्रकार  व कामगार-अधिकाऱ्यांना सहन  करावा लागणारा मानसिक त्रास टाळण्यासाठी संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना पालिका प्रशासनाने तात्काळ ‘कॅशलेस’ योजना लागू करण्यात यावी.प्रशासनाकडे कोणत्याही कामगाराचा अर्ज आल्यानंतर त्यावर सात दिवसाच्या आत कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्यांच्या अर्जावर प्रशासनाकडून उत्तर लवकर भेटत नाही. हेलपाटे मारावे लागतात, हे कोठेतरी थांबले पाहिजे.परिवहन उपक्रमातील ठोक मानधनावरील  कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविण्यात यावे. पीएफ, ग्रॅच्यईटी, वैद्यकीय भत्ता, पगारी  रजा सह अन्य सुविधा या कामगारांना प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात.कोविड काळात कार्यरत असणार्‍या एएनएम आणि समूह संघटक यांना प्रवास भत्ता व भ्रमणध्वनी भत्ता देण्यात यावा.राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोविड काळात सर्व कामगारांना ३०० रूपये भत्ता लागू करण्यात आला, आपल्या महापालिकेत हा भत्ता अद्यापि देण्यात आला नाही. कामगारांना हा भत्ता  प्रशासनाकडून देण्यात यावा.फार्मासिस्ट, टेक्निशियन, डायटीशियन एक्स-रे टेक्निशियन ओटी असिस्टंट व अन्य संवर्ग एकाकी आहेत. सातव्या वेतन आयोगामध्ये सलग दहा वर्षे सेवेनंतर वरिष्ठ पदाची कालबद्ध पदोन्नती देण्याची शिफारस आहे अशाप्रकारे कालबध्द पदोन्नती आयोजित आकृतिबंध यामध्येच वरिष्ठ फार्मासिस्ट,  वरिष्ठ टेक्निशियन वरिष्ठ आहार तज्ञ अशा प्रकारची पदोन्नतीचे श्रृंखला निर्माण केल्यास कर्मचाऱ्यास सेवा केल्याचे मानसिक समाधान मिळते, याच बाबीचा विचार करून घनकचरा व्यवस्थापन विभागात स्वच्छता निरीक्षक स्वच्छता अधिकारी उपमुख्य स्वच्छता अधिकारी व मुख्य स्वच्छता अधिकारी इत्यादी पदे निर्माण केली व अशा प्रकारची पदे निर्माण करण्याची तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २०११ मधील कलम ५१ (२) मध्ये तरतूद आहे. या तरतूदींचे प्रशासनाने पालन करावे.आरोग्य विभागात राष्ट्रीय क्षयरोग नियत्रंण कार्यक्रमातंर्गत काम करणारे सर्व कर्मचारी १८ वर्षे काम करूनही त्यांची सेवा अजून कायम झालेली नाही. त्यांची सेवा कायम करण्यात यावी. समान कामाला समान वेतन या निकष या कामगारांच्या वेतनात लावण्यात यावा, या मागण्यांचा निवेदनात कामगार नेते रवींद्र सावंत यांनी समावेश केला होता. पालिका आयुक्तांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे व कामगारांनाही थेट रवींद्र सावंत यांनी शिष्टमंडळात घेतल्याने कामगार वर्गाकडून आयुक्त व कामगार नेते रवींद्र सावंत यांचे आभार मानण्यात आले.


Popular posts
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
नवी मुंबईतील करावे गावात शेकडो अनधिकृत इमारतींचे बांधकामे सुरु ? बेलापूर विभाग कार्यालय व सिडकोचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? भूमाफियांनी अभय २५ ते ३० लाख रुपयांची प्रति इमारत सेटलमेंट, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर हातोडा
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image