विशेष शिबिरात 101 पत्रकारांची कोव्हीड 19 आर.टी.-पी.सी.आर.चाचणी


नवी मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 'मिशन ब्रेक द चेन' हाती घेऊन विविध उपाययोजना राबविल्या जात असताना नवी मुंबई शहरात पत्रकारिता करणा-या विविध वृत्तपत्र व वृत्तचित्रवाहिनी प्रतिनिधी आणि कॅमेरामन यांच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचेकडे सर्व पत्रकारांची कोव्हीड 19 तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. इतर अनेक अत्यावश्यक सेवेतील घटकांप्रमाणेच पत्रकारही सामाजिक भावनेतून समाजात मिसळून आपले काम करीत असतात हे अधोरेखीत करीत महापालिका आयुक्तांनी या मागणीला त्वरीत मान्यता दिली होती.त्यास अनुसरून आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून पत्रकारांकरिता कोव्हीड 19 आर.टी.-पी.सी.आर. चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास चांगला प्रतिसाद देत विविध वृत्तपत्रे व वृत्तचित्रवाहिन्यांमध्ये कार्यरत 101 प्रतिनिधी, कॅमेरामन यांनी आपली चाचणी करून घेतली.नवी मुंबई महानगरपालिकेची नेरूळ येथे अत्यंत अद्ययावत अशी 1000 चाचण्या प्रतिदिन क्षमतेची अत्याधुनिक आर.टी.-पी.सी.आर. प्रयोगशाळा कार्यान्वित असून 24 तासांच्या आत या चाचण्यांचे अहवाल प्राप्त होणार आहेत. यामध्ये पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होणा-या पत्रकारांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या लक्षणांनुसार योग्य आरोग्य सुविधेमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. 


Popular posts
अगोदर नोटीस, मग कारवाई, नंतर सेटलमेंट, इमारत पुन्हा उभी ? , तुर्भे विभाग कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात ? , तुर्भे विभाग अधिकारी व सिडको अधिकारी यांच्या भूमिकेवर संशय ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे दोन महिन्यात दोन मजले उभे ? , दोनदा कारवाई नंतर १५ लाख घेऊन बांधकामाला परवानगी दिल्याची चर्चा ? , दिवाळी अगोदर दोन मजले पूर्ण करण्याचे आदेश कोणाचे, सिडको चे मनपाचे ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image
अनधिकृत लॉजिंगमुळे शिरवणे गावाचे अस्तित्व धोक्यात, गावातील लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये वेश्याव्यवसाय, राहत्या इमारती मध्ये लॉजिंगचे अनधिकृत बांधकाम,अतिक्रमण विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?
Image
कोकणातील गणेशोत्सवावर कोरोनाच्या मर्यादा - राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना
Image