वेटिंग वरील सुरक्षा रक्षक सोडून बोर्डाची मनपा बरोबर सेंटिंग ?


नवी मुंबई - गेल्या अनेक महिन्यांपासून काम मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागात काम देण्याऐवजी त्यांना वेटिंगवरच ठेवण्यात आलेल्या बोर्ड अधिकाऱ्यांची मनपा अधिकाऱ्यांबरोबर सेटिंग तर झाली नाही ना ? असा प्रश्न सुरक्षा रक्षकांना पडला आहे.मनपाच्या उद्यान विभागात सुरक्षा रक्षकांसाठी शेकडो जागा असून त्या ठिकाणी खासगी एजन्सीच्या सुरक्षा रक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे.सदरील बाब बोर्डाच्या अधिकाऱ्यांना माहित असतांनाही याकडे का ते दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
                 सुरक्षा रक्षक म्हणून तरुणांना नोकरी मिळावी.या कामाचा त्यांना योग्य मोबदला मिळावा म्हणून सरकारने सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना केली. सरकारी, निमसरकारी कार्यालये, विविध महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांनी सरकारच्या मंडळाकडूनच रक्षक घ्यावेत, असे आदेशही देण्यात आले, मात्र काही अपवाद वगळता बहुतांश सरकारी कार्यालयांनी खासगी एजन्सीकडून सुरक्षा रक्षक घेतले असल्याचे निदर्शनास आले आहेत.त्यामुळे मंडळाकडे नोंदणी केलेले तरूण आजही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.सानपाडा येथील सुरक्षा रक्षक मंडळात तब्बल दोन हजारांच्या जवळपास सुरक्षा रक्षक कामाच्या प्रतीक्षेत आहेत.आज ना उद्या काम मिळेल या अपेक्षेपोटी शेकडो तरुण बोर्डाच्या कार्यालजवळ हजेरी लावत असतात.त्यांना काम देणे हि बोर्ड अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याने त्याकडे ते स्वहितासाठी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या चार महिन्यांपासून मनपाच्या उद्यान विभागात नमो फैसिलीटी सर्व्हिसेस कंपनीचे १०० हुन अधिक गार्ड काम करत आहेत.त्यांना मंडळाच्या नियमानुसार वेतन देणे गरजेचे असतांनाही त्यांना तुटपुंजे वेतन देण्यात येत आहेत.सदरील बाब मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहित असूनही ते मूग गिळून गप्प आहेत.जर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मनपाला धारेवर धरले असते तर आजमितीस मंडळाच्या वेटिंगवरील अनेकांना काम मिळाले असते.तसे होत नसल्याने मनपा, नमो फैसिलीटी सर्व्हिसेस कंपनी व मंडळ अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे.राज्यातील खासगी सुरक्षा रक्षकांच्या नोकरीचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियमन १९८१ कायदा लागू करण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्र खासगी सुरक्षा सल्लागार मंडळाची स्थापन करण्यात आली. समितीच्या २००६च्या निर्णयानुसार सरकारी, निमसरकारी कार्यालये, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था आदी ठिकाणी मंडळाकडूनच सुरक्षा रक्षक घ्यावेत, असे बंधनकारक करण्यात आले.शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर शिक्षेची, दंडाची तरतूद करण्याची तरतूद कायद्यात आहे, मात्र त्याची अमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही.


कोट - या विषयी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. 
अध्यक्ष - राजेश आडे (सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळ)


 


Popular posts
<no title>
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image
नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image