पैश्यासाठी पोटच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या आईला अटक
नवी मुंबई : पोटच्या मुलीला वैश्याव्यवसायात ढकलणाऱ्या आईला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.त्याचवेळी संबंधित मुलीलाही अटक करण्यात आली असून तिला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेली महिला पोटच्या मुलीबरोबर वैश्यगमनासाठी कोण जास्त पैसे देईल याच्या शोधात होती.
या प्रकरणाची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांना गुप्त माहिती मिळाली होती. मीरा-भाईंदर येथे राहणाऱ्या एका महिलेस सुमारे अठरा वर्षे वयाची तरुण मुलगी आहे.स्वतःच्या मुलीचा यापूर्वी कोणत्याही पुरुषाबरोबर शरीर संबंध झालेला नसल्याचं सांगत ही महिला तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेण्याचा प्रयत्न करत होती. यासाठी ती ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकामार्फत आरोपी महिलेसोबत बोलणं केलं.तिने या बनावट ग्राहकाकडे यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. अखेर बोलणे झाल्यानंतर आरोपीने हा सौदा एक लाख वीस हजार रुपयांमध्ये ठरवला. पोलिसाच्या बनावट ग्राहकाने शिरवणे गाव (नेरुळ) येथील हॉटेल कोहिनूर पॅलेस येथे आरोपी महिलेच्या सांगण्यावरुन एक रुम बुक केली.त्यानुसार सायंकाळी पाचच्या सुमारास ही महिला मीरा-भाईंदर येथून इंडिका कारने आपल्या मुलीसह हॉटेलमध्ये आली. या ठिकाणी आरोपी महिलेबरोबर बनावट ग्राहकाने बोलणं केलं. तसेच आईच्या सांगण्याप्रमाणे मुलीस घेऊन रुममध्ये गेला. रुममध्ये ही मुलगी वेश्यागमनासाठी अर्धनग्न होत होती.त्यावेळी बनावट ग्राहकाने पोलिसांना मोबाईलवरुन ठरल्याप्रमाणे इशारा केला. यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड आणि त्यांच्या पथकाने पंचासह छापा टाकला.या कारवाईमध्ये पीडित मुलीची आई पोलिसांच्या जाळ्यात सापडली.त्याचवेळी पोलिसांनी तिला व तिच्या मुलीला ताब्यात घेतले.आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अन्वये नेरुळ पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. 228/20 कलम 370 भा.द.वि.सं., सह कलम 4,5 गुन्हा करून तिला अटक केली आणि पिडित मुलीस सुधारगृहामध्ये पाठविण्यात आलेले आहे.
पैश्यासाठी पोटच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या आईला अटक