नवी मुंबई - कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात आलेले हातमोजे पुन्हा धुऊन विक्रीसाठी तयार करणाऱ्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.यात एकूण ५० लाख रुपयांहून अधिक रकमेचे हॅन्डग्लोज पोलिसांनी हस्तगत केले आहेत.अटक करण्यात आलेलं सर्व जण विविध जिल्ह्यातील तसेच राज्यातील रहिवाशी आहेत.या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी प्रशांत सुर्वे असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून तो सीबीडी बेलापूर या ठिकाणी राहणारा आहे.पावणे एमआयडीसी मधील गामी इंडस्ट्रियल पार्क मध्ये काही इसम कोरोना रुग्णाच्या उपचारा करीता वापरण्यात आलेले निळ्या रंगाचे हातमोजे नष्ट करणे आवश्यक असतांना बेकायदेशीरपणे ते पुन्हा धुऊन वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला.व त्या ठिकाणी चौकशी केली असता लिक्विड सोप व अन्य केमिकल्सने वाशिंग मशींगमध्ये धुऊन हातमोजे वाळवून पुन्हा ते नवीन पाकिटात पॅक केले असल्याचे दिसून आले.त्यांना अटक करत त्यांच्या टोळीचा शोध घ्यायला सुरवात केली.त्याची चौकशी केली असता त्याने हॅन्डग्लोज भिवंडी आणि वाळुंज एमआयडीसी औरंगाबाद येथून आणल्याचे सांगितले.त्यानंतर पोलिसांनी भिवंडी मधील गोडाऊन वर छापा मार्ट तेथील विपुल शहा याना ताब्यात घेतले तर १५ लाख रुपयांचे हॅन्डग्लोज हस्तगत केले.त्यानंतर औरंगाबाद या ठिकाणी छापा मारला असता तेथून अफरोज इनायत याला ताब्यात घेत त्याच्याजवळून १९ लाख रुपये किमतीचे हॅन्डग्लोज ताब्यात घेतले.त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदरचा माल हा हैद्राबाद आणि बंगलोर या ठिकाणाहून घेतला असल्याचे उघड झाले.त्यामुळे पोलिसांनी बंगलोर या ठिकाणी छापा मारला व त्या ठिकाणाहून लतीफ सिद्दीकी याला ताब्यात घेत त्याच्याजवळून १० लाखांचा माल हस्तगत केला.त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत सुर्वे यांनी १०७ जणांना हॅन्डग्लोज विकले होते तेही पोलिसांनी हस्तगत केले.प्रशांत सुर्वे आणि माल घेणारे तरुण रामनाणी हे मुख्य सूत्रधार असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे.
डॉक्टरांनी वापरलेले नायटाईल हॅन्डग्लोजची पुन्हा विक्री करणाऱ्या टोळीला अटक