सिडको भवन व सिडकोच्या इतर कार्यालयांमध्ये अभ्यागतांना मर्यादित स्वरूपात प्रवेश सुरू


नवी मुंबई - राज्य शासनाच्या मिशन बिगिन अगेन या टाळेबंदी काळातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याच्या कार्यक्रमांतर्गत सिडको भवन, रायगड भवन आणि सिडकोच्या नवी मुंबईतील इतर कार्यालयांमध्ये अभ्यागतांना मर्यादित स्वरूपात काही अटींवर आणि नियोजित वेळापत्रकानुसार प्रवेश देण्याचा निर्णय सिडको प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. सामाजिक अंतराचे भान राखून व आरोग्यविषयक आवश्यक ती खबरदारी घेऊनच अभ्यागतांना (visitors) यापूर्वी सुरू असलेल्या ई-पास व कलर कोड यंत्रणेची अंमलबजावणी करत प्रवेश देण्यात येणार आहे.
              कोविड-१९ साथीचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या सिडको भवन, रायगड भवन व नवी मुंबईतील इतर कार्यालयांमध्ये अभ्यागतांना २३ मार्च २०२० पासून पूर्णत: प्रवेशबंदी करण्यात आली होती. मिशन बिगिन अगेन कार्यक्रमा अंतर्गत शासनातर्फे देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करून अभ्यागतांना सिडको कार्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. यापुढे अभ्यागतांना सिडको कार्यालयात प्रवेश करतेवेळी ई-पास आणि कलर यंत्रणेद्वारे जारी करण्यात आलेला संबंधित मजल्यावर जाण्यासाठी जारी करण्यात आलेला विशिष्ट रंगाचा पास बाळगणे आवश्यक असणार आहे. ज्या अभ्यागतांनी पूर्व परवानगी घेतली आहे अशांना सर्व कार्यालयीन कामकाजांच्या दिवशी दुपारी २.०० ते ५.०० या कालावधीत प्रवेश देण्यात येणार आहे. ज्या अभ्यागतांनी पूर्व परवानगी घेतली नसेल अशांना पुढील विभागनिहाय वेळापत्रकाप्रमाणे दुपारी २.०० ते ५.०० या कालावधीत प्रवेश देण्यात येईल :- सोमवार व मंगळवार - अभियांत्रिकी आणि नियोजन विभाग; मंगळवार व गुरुवार - वसाहत-१, २, ३ आणि लेखा विभाग; मंगळवार व शुक्रवार - २२.५% भूमी व  भूसंपादन, कार्मिक, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच सहव्यवस्थापकीय संचालक-१, २ व ३ यांचे कार्यालय तर बुधवार व शुक्रवार - दक्षता विभाग, जनसंपर्क विभाग, कॉर्पोरेट प्रोजेक्ट, १२.५% भूमी व भूसंपादन विभाग, अशा प्रकारे विभागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व विभाग प्रमुखांचे एम एस टीम आयडी सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून त्यावर अभ्यागत त्यांना विहित केलेल्या दिवशी व वेळेत संबंधित विभाग प्रमुखांशी संपर्क साधू शकतील. सिडकोच्या रायगड भवन व इतर नोडल कार्यालयांमध्ये अभ्यागतांना प्रवेश देण्याबाबत यापूर्वी जशी पद्धत सुरू होती त्याप्रमाणेच सुरक्षा विभागाद्वारे संबंधित अधिकाऱ्याबरोबर शहानिशा केल्यानंतरच अभ्यागतांना दुपारी २.०० ते ५.०० या कालावधीत कार्यालयात प्रवेश देण्यात येईल.प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांकडून अभ्यागतांचे थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिजन पातळी तपासणी करण्यात येईल. तसेच अभ्यागतांनीही कार्यालय आवारात व इमारतीत वावरताना सोशल डिस्टंसींग पाळून मास्कचा वापर करणे बंधनकारक राहिल. मिशन बिगिन अंतर्गत देण्यात आलेल्या या निर्देशांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद घेण्यात यावी.


Popular posts
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
नवी मुंबईतील करावे गावात शेकडो अनधिकृत इमारतींचे बांधकामे सुरु ? बेलापूर विभाग कार्यालय व सिडकोचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? भूमाफियांनी अभय २५ ते ३० लाख रुपयांची प्रति इमारत सेटलमेंट, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर हातोडा
Image
नागरी सुविधा प्रकल्प कार्यान्वित करण्याप्रमाणेच महसूल वाढीवर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
Image