नवी मुंबई महानगरपालिकेची कोव्हीड 19 लसीकरणाची तयारी, पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी संबंधित 16 हजाराहून अधिक कोव्हिड योध्द्यांच्या लसीकरणाचे नियोजन


नवी मुंबई - केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोव्हिड 19 लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्यासाठीची आवश्यक तयारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत आहे. या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत नवी मुंबई महानगरपालिका तसेच खाजगी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, कर्मचारी, आशा, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी अशा कोव्हीड योध्द्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

                 या कोव्हीड 19 लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात टास्क फोर्स सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाची सुयोग्य कार्यवाही पार पाडण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे असे आवाहन केले.या बैठकीस वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, उपआयुक्त क्रांती पाटील, सहा. आयुक्त संध्या अंबादे, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. अरूण काटकर, यूएनडीपीचे प्रतिनिधी गौतम कांबळे यांच्यासह जिल्हा लसीकरण अधिकारी यांच्यासह महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक, नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, विविध वैद्यकीय संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी तसेच वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रतिनिधी वेबसंवादाव्दारे उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी सादरीकरणाव्दारे लसीकरण मोहीम राबविण्यासाठी आवश्यक बाबींची तसेच महानगरपालिकेच्या वतीने केलेल्या तयारीची माहिती दिली.कोविड 19 लसीकरण अंतर्गत पहिल्या टप्प्याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या 42 केंद्रांमधील 4490 कर्मचारी तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत 904 संस्थांतील 12431 कर्मचारी यांची संगणकीकृत नोंद महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे.लसीकरणाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसली तरी सक्षम पूर्वतयारी करीत हे नियोजन करण्यात आलेले असून लसीकरण सुरू झाल्यानंतर नोंदणी झालेल्या व्यक्तीस लसीकरणाचा दिवस व स्थळाबाबत त्याने नोंदणी केलेल्या मोबाईलवर मेजेस येणार आहे. लसीकरण झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्रही मोबाईलवर प्राप्त होणार आहे.कोव्हीड 19 लसीकरण स्थळाच्या रचनेमध्ये प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष स्वतंत्र असणार असून प्रत्येक पथकामध्ये 4 व्हॅक्सीनेशन ऑफिसर व 1 व्हॅक्सीनेटर ऑफिसर यांचा समावेश असणार आहे. एका केंद्रावर दररोज 100 व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.या लसीकरण मोहिमेसाठी राज्य तसेच जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले असून नवी मुंबई महानगरपालिका स्तरावरही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण 17 डिसेंबर रोजी झालेले आहे. याशिवाय 22 डिसेंबरला कर्मचा-यांनाही प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.लसीकरण झाल्यानंतरही वारंवार हात धुणे अथवा सॅनिटायझरचा वापर करणे तसेच मास्क घालणे व सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक असून या बैठकीत सर्व संस्थांनी आवश्यकतेनुसार अपेक्षित मनुष्यबळ तसेच लसीकरणासाठी जागा अशा पूरक बाबी उपलब्ध करुन द्याव्यात असे आयुक्त अभिजीत बांगर यांचेमार्फत सूचित करण्यात आले आहे. कोरोनाच्या लसीला केंद्र सरकारकडून मान्यता प्राप्त झाल्यानंतर करावयाच्या लसीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे.

Popular posts
अगोदर नोटीस, मग कारवाई, नंतर सेटलमेंट, इमारत पुन्हा उभी ? , तुर्भे विभाग कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात ? , तुर्भे विभाग अधिकारी व सिडको अधिकारी यांच्या भूमिकेवर संशय ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे दोन महिन्यात दोन मजले उभे ? , दोनदा कारवाई नंतर १५ लाख घेऊन बांधकामाला परवानगी दिल्याची चर्चा ? , दिवाळी अगोदर दोन मजले पूर्ण करण्याचे आदेश कोणाचे, सिडको चे मनपाचे ?
Image
अनधिकृत लॉजिंगमुळे शिरवणे गावाचे अस्तित्व धोक्यात, गावातील लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये वेश्याव्यवसाय, राहत्या इमारती मध्ये लॉजिंगचे अनधिकृत बांधकाम,अतिक्रमण विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?
Image
मनपा रूग्णालयातील एनआयसीयू बेड्समध्ये मोठी वाढ केल्याने अधिक उपचार सुविधा उपलब्ध
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image