स्थानिकांना अंधारात ठेऊन नगरसेवकांचा विकासकामांचा शुभारंभ - ऍड.निलेश भोजने

नवी मुंबई - प्रभागात होत असलेल्या कामांची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधीने नागरिकांना देणे गरजेचे असतांना ती लपवली जात असल्याची माहिती ऍड.निलेश भोजने यांनी वाशी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. याविषयी माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्याऐवजी भोजने यांना गुंड म्हणून संबोधल्याने भोजने यांनी नाराजी व्यक्त केली आहे.त्याचबरोबर मनपाचा कोणताही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नसतांना गायकवाड यांचा उदघाटन करण्याचा घाट का असाही प्रश्न भोजने यांनी उपस्थित केला आहे.

                     वाशी सेक्टर ६ येथे जुन्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम तोडून त्या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाकीचे  बांधकाम मनपाकडून सुरु करण्यात आले आहे.तर या कामाचे भूमिपूजन होत असतांनाही माजी नगरसेविका दिव्या गायकवाड व माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले नाही.यावर आम्ही त्यांना विचारणा करण्यासाठी गेलो असता त्यांनी या कामाची माहिती देण्याऐवजी मला गुंड म्हणून संबोधले. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागातील प्रतिष्ठित नागरिकांची बदनामी करण्याचा घाट या नगरसेवकांमार्फत सुरु असून राजकीय सूडबुद्धीने सदर प्रकार करण्यात आला असल्याचा आरोपही भोजने यांनी केला आहे.ज्यावेळी पाण्याच्या टाकीच्या कामाचा शुभारंभ झाला त्यावेळी त्या ठिकाणी मनपाचा कोणताही अधिकारी त्या ठिकाणी नव्हता.याची माहिती मिळताच भोजने यांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली.व विचारणा केली असता गायकवाड यांनी माहिती देण्यास नकार देत अरेरावीची भाषा वापरली असल्याचीही माहिती भोजने यांनी दिली. 


पाण्याची टाकी बांधण्याच्या कामाची वर्क ऑर्डर असून पालिकेने काम सुरु केले आहे.त्यामुळे ते कामाचे उद्घाटन करण्यात येत आहे.त्या ठिकाणी राहत नसणारे गृहस्थ मुद्दामहून कामामध्ये खोडा घालण्याचे काम करत असून बिनबुडाचे आरोप करत आहेत.त्याच्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी सांगितले.


Popular posts
नवीन कायद्याचा वापर करुन देशामध्ये असलेला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबध्द - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image
नवी मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी की वसुली अधिकारी ?, एपीएमसी मधील मार्जिनल स्पेस धारकांकडून केली जाते ७ ते ८ लाखांची प्रतिमहिना वसुली ?, अधिकाऱ्यांकडून कारवाई कमी आणि सेटलमेंट जास्त होत असल्याची चर्चा ?
Image
युवकांनो...“ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या..! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचे उद्घाटन संपन्न
Image
*स्वच्छ सर्वेक्षणातील 'सुपर स्वच्छ लीग' या नव्याने समाविष्ट विशेष कॅटेगरीत, देशातील तीन शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश - महाराष्ट्रातील एकमेव शहर*
Image