विभागीय अग्निशमन अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण


नवी मुंबई - अनधिकृत व अतिक्रमण प्रकरणात सामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उभारणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतःच्या अधिकाऱ्याला याच प्रकरणात अभय दिल्यास येत्या ८ मार्च पासून महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई मनपा मुख्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा राजे प्रतिष्टान नवी मुंबई सचिव योगेश महाजन यांनी दिला आहे.महाजन यांनी बुधवारी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची या प्रकरणी भेट घेत या प्रकरणी तत्काळ पावले उचलण्याची विनंती केली.त्या नंतर एकतर्फी न्यायाचे विरोधात आम्ही ८ मार्च या महिला दिनापासून समस्त अतिक्रमण पीडित धारक ,फेरीवाले त्यात महिलांच्या सहभागासह आमरण उपोषणास सीबीडी येथील मनपा मुख्य कार्यालयासमोर बसू असा इशारा दिला आहे.

                अतिक्रमण विभागाच्या सतत कारवाया सुरु असून याचा फटका सामान्य नागरिकांना पडत आहे.कधी कोरोना तर कधी स्वच्छ भारत अभियानच्या नावाखाली कारवाया कठोर केल्या जात असल्याने जगायचे तरी कस असा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर उभारला आहे.अनधिकृत बांधकाम अथवा अतिक्रमण हे बेकायदेशीरच असल्याने बहुतांश होणाऱ्या कारवाईला सामोरे जातात.हे सर्व माहित असतांनाही कायद्याचे रक्षकच जर स्वतःच अतिक्रमण करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करायची कोणी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.याचाच भाग म्हणून राजे प्रतिष्ठानने या प्रकरणात पुढाकार घेत अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विभागीय अग्निशनम अधिकारी पुरोषोत्तम विनायकराव जाधव यांच्यावर तत्काळ कारवाई करावी या आशयाचे निवेदन एक महिन्यापूर्वी आयुक्तांना दिले आहे.त्या नंतर मात्र काहीच हालचाली न झाल्याने अतिक्रमण कारवाया थांबवण्याचे निवेदन देण्यात आले.त्यावरही दखल न घेण्यात आल्याने समस्त अतिक्रमण पीडित धारक ,फेरीवाले त्यात महिलांच्या सहभागासह आमरण उपोषणास सीबीडी येथील मनपा मुख्य कार्यालयासमोर बसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.येत्या ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून या उपोषणाला सुरवात करण्यात येईल असे यावेळी महाजन यांनी स्पष्ट केले आहे.नियमांची कोणतीही माहिती नसलेले गरीब फेरीवाले ,झोपडीधारक, चाळधारक, किंवा गरिबीमुळे परवडणारी घरे न घेता अनधिकृत इमारतीतील रहिवाशी यांचेवर आपले अतिक्रमण विभागामार्फत वारंवार कारवाई होते.नियमांचे कमी माहिती असलेले लोकप्रतिनिधी आपले प्रशासन अनधिकृत बांधकामाचे कारण देत नगरसेवक सारखे पदावरून काढून टाकतात.म्हणजे सामान्य जनता ते लोकप्रतिनिधी यांचेवर तत्काळ कारवाई करणारे नमुमपा प्रशासन एका वरिष्ठ अधिकाऱ्यास अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम करणे हे सिद्ध होऊनसुद्धा काहीच कारवाईचे पाऊल उचलत नाही हि दुःखाची बाब असल्याची खंत यावेळी महाजन यांनी व्यक्त केली.


Popular posts
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
नवी मुंबईतील करावे गावात शेकडो अनधिकृत इमारतींचे बांधकामे सुरु ? बेलापूर विभाग कार्यालय व सिडकोचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? भूमाफियांनी अभय २५ ते ३० लाख रुपयांची प्रति इमारत सेटलमेंट, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर हातोडा
Image
नागरी सुविधा प्रकल्प कार्यान्वित करण्याप्रमाणेच महसूल वाढीवर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
Image