वीजबिलाची थकबाकी पोहचली ६०० कोटींवर,बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा होतोय खंडित

नवी मुबई  - महावितरणच्या कल्याण परिमंडळात वीजबिल थकबाकी तब्बल ६०० कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहचली आहे. या विक्रमी थकबाकीसह चालू वीजबिल वसूल करण्यासाठी सध्या व्यापक मोहीम सुरु आहे.वीज ग्राहकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत ७३३ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला. इतर ग्राहकांनीही चालू वीजबिलासह थकबाकी भरून कठीण आर्थिक परिस्थितीत महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे. 

                कल्याण परिमंडळात सर्व वर्गवारीचे जवळपास २६ लाख वीज ग्राहक आहेत. यातील २ लाख ३२ हजार ग्राहकांनी मार्च २०२० नंतर गेल्या वर्षभरात वीजबिलाचा एक रुपयाही भरलेला नव्हता. या ग्राहकांकडे २३० कोटी रुपयांची थकबाकी होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सातत्याने पाठपुरावा व विनंती केल्यानंतर यातील १ लाख ५४ हजार ग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाचा भरणा एकरकमी अथवा हप्त्याने केला. परंतु अजूनही ७८ हजार ग्राहकांनी वीजबिल भरणे टाळले असून त्यांच्याकडे ७० कोटी रुपयांची थकबाकी आहे. अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी चोरून अथवा इतरांकडून वीजपुरवठा सुरु ठेवल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहक व अनधिकृतपणे वीज देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दहा पथकांची करडी नजर या ग्राहकांवर राहणार आहे.फेब्रुवारी महिन्यात ६६० कोटी रुपये चालू वीजबिल व ६७५ कोटी रुपये थकबाकी अशा एकूण १३३५ कोटी रुपयांचा भरणा आवश्यक होता. परंतु तब्बल ६०० कोटी रुपयांच्या थकीत वीजबिलाची अद्याप वसुली होऊ शकलेली नाही. या थकबाकीचे ओझे घेऊनच महावितरण कर्मचाऱ्यांना मार्च अखेरच्या वसुलीला सामोरे जावे लागणार आहे. महावितरणची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन व अखंडित विजेसाठी चालू वीजबिल व थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.

२०२ कोटींचा ऑनलाईन भरणा 

कल्याण परिमंडलात डिजिटल माध्यमांचा वापर करत ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्या लघुदाब ग्राहकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत २०२ कोटी रुपयांचा वीजबिल भरणा ऑनलाईन प्रणालीने झाला आहे. ७ लाख ८० हजार ५०० ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकीत बिलाचा भरणा करण्यासाठी डिजिटल पेमेन्टचा पर्याय निवडला. कोरोना विषाणूचा पुन्हा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता अधिकाधिक ग्राहकांनी सुलभ असलेल्या डिजिटल माध्यमांचा वापर करून ऑनलाईन भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Popular posts
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
नवी मुंबईतील करावे गावात शेकडो अनधिकृत इमारतींचे बांधकामे सुरु ? बेलापूर विभाग कार्यालय व सिडकोचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? भूमाफियांनी अभय २५ ते ३० लाख रुपयांची प्रति इमारत सेटलमेंट, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर हातोडा
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image