कोरोनामुक्त चार रुग्णांवर यकृत प्रत्यारोपणाच्या अपोलोकडून यशस्वी शस्त्रक्रिया

नवी मुंबई - अपोलो हॉस्पिटलमध्ये कोरोना या आजारातून बऱ्या झालेल्या चार रुग्णांवर यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या. या चारही रुग्णांना यकृताचा शेवटच्या टप्प्यातील आजार असल्याचे निदान झाले होते. तीन रुग्णांमध्ये प्रत्यारोपण झालेली यकृते ही हयात असलेल्या दात्यांकडून मिळविण्यात आली, तर एका रुग्णामध्ये प्रत्यारोपित झालेले यकृत हे एका मृत दात्याचे होते. यकृत प्रत्यारोपण झालेले हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत व त्यांची प्रकृती आता उत्तम आहे.

              ३७ वर्षीय सागर गडकरी मागील ८ महिन्यांपासून यकृताच्या आजाराने ग्रस्त होता. बिघडलेल्या यकृतामुळे त्याला वारंवार जलोदर आणि रक्ताच्या उलट्या यांचा त्रास होत होता. त्याला तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. त्याचवेळी त्याला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे त्याचे प्रकरण अधिक आव्हानात्मक बनले. कोरोना साथीपासून बचावाकरीता घालून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे खबरदारी घेत, नवी मुंबईतील अपोलो मधील यकृत प्रत्यारोपण करणाऱ्या तज्ज्ञांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया संबंधित रुग्णावर यशस्वीरित्या केली.इथेनॉलशी संबंधित विघटनशील क्रोनिक यकृत रोगाने ग्रस्त असलेला ६४ वर्षीय विष्णु चव्हाण सतत ताप आणि मायल्जियासह अपोलो रुग्णालयात आला.‘आरटी-पीसीआर’ चाचणी पॉझिटिव्ह आली. कोरोना पासून बरा झाल्यानंतर यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला तयार करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात आली. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे, जिवंत-संबंधित दाता यकृत प्रत्यारोपणासाठी अयोग्य दाता मिळण्यासारख्या अनेक गुंतागुंतीच्या घटना उद्भवल्या. शल्यक्रिया होण्यापूर्वी आरटी-पीसीआर चाचणी घेऊन अवयवदात्याच्या यकृताचे आवश्यक ते मूल्यांकन करण्यात आले आणि रुग्णावर यकृत प्रत्यारोपण यशस्वी झाले. आता हा रुग्ण स्वस्थ आहे. याचप्रमाणे तन्वी पालांडे १९ वर्षीय हिच्यावर देखील लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या करण्यात आले.नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील हेपेटोलॉजी (अ‍ॅडल्ट एंड पॅडियाट्रिक्स) या विभागाच्या कन्सल्टंट डॉ. आभा नगराल म्हणाल्या,कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे हे केवळ रूग्ण व तिच्या कुटुंबासाठीच नाही, तर रुग्णालयातील संपूर्ण यंत्रणा आणि वैद्यकीय कार्यसंघ यांच्यासमोरही मोठे आव्हान होते. कोरोना मधून बरे झाल्यानंतरदेखील यकृत खराब असलेल्या स्थितीतील रूग्णांवर उपचार करताना प्रचंड आव्हानांचा सामना करावा लागतो, कारण या रूग्णांमध्ये जंतूसंसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त असते. आपत्कालीन परिस्थिती असूनही, यकृत प्रत्यारोपणाची क्रिया सुरू ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. ही शस्त्रक्रिया करण्यासाठीची रुग्णांची मोठी प्रतीक्षा यादी कमी करणे आणि मृत्यूदर घटविणे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. काही केसेसमध्ये कोरोनाची लागण झालेल्या व यकृताचा अखेरच्या टप्प्यातील आजार असलेल्या रुग्णांना विषाणू-संसर्ग होऊ नये म्हणून अतिकाळजी घेण्यात आली. प्रोटोकॉल पाळून, आम्ही जीवन वाचविण्यासाठी नेटाने उपचार केले आणि कोरोना पासून बरे झालेल्या चार रुग्णांवर यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले.अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईच्या एचपीबी अँड लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरीचे कन्सल्टंट डॉ. विक्रम राऊत म्हणाले, "यकृताची गंभीर स्थिती असलेल्या चार रुग्णांवर उपचार करणे आव्हानात्मक होते. आमच्याकडे आलेल्या या केसेस अतिशय गुंतागुंतीच्या होत्या. त्यातच या रुग्णांना कोरोनाची लागण झालेली होती; तथापि, कोरोनाच्या अनिवार्य खबरदारीचे पालन करून आणि कोविडच्या चाचण्यांचे निगेटिव्ह अहवाल प्राप्त करून आम्ही सर्व रूग्णांवर यकृताचे प्रत्यारोपण केले. या रूग्णांपैकी एकाला कोरोना पासून बरे झाल्यानंतर मृत व्यक्तीकडून अवयवदान घ्यावे लागले. अशा प्रकारे पश्चिम भारतातील कोविडपश्चात ‘डीडीएलटी’ची (डीसीज्ड डोनर लिव्हर ट्रान्सप्लॅंट) ही पहिली केस ठरली. रुग्णाला कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून शस्त्रक्रियेदरम्यान व नंतरही त्याची अति काळजी घेण्यात आली. तसेच, रक्त उत्पादने, औषधे, अन्य वस्तूंचा पुरवठा व पायाभूत सुविधा यांची पुरेशी उपलब्धता असेल, याची खबरदारी घेण्यात आली. शस्त्रक्रियेनंतरचे जंतूसंसर्ग प्रतिबंधक उपायांचा कठोरपणे अवलंब करून आणि विलगीकरणाचे प्रोटोकॉल व ‘इम्युनोसप्रेशन’ चे व्यवस्थापन करून आम्ही कोरोना साथीच्या काळातही यशस्वीपणे यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करू शकतो याचे एक उदाहरण घालून दिले.नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल्सचे युनिट हेड व सीओओ संतोष मराठे यांनी नमूद केले, “गेल्या अनेक वर्षांत आमच्या संस्थेने प्रत्यारोपणाच्या असंख्य शस्त्रक्रिया केल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, हे वर्ष मोठेच आव्हानात्मक ठरले. त्यातच, यकृताचा जुनाट आजार असलेल्या रुग्णांमध्ये गुंतागुंत झाल्याच्या घटना देशभर पाहावयास मिळाल्या. अशा परिस्थितीत, सर्व आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियंत्रण प्रोटोकॉलचे अनुसरण करून, आम्ही प्रत्यारोपणासारखे उपचार सुरू ठेवले, कारण यातील बहुतांश रुग्णांचे अवयव अखेरच्या टप्प्यापर्यंत निकामी झाले होते. गेल्या १४ महिन्यांत आम्ही यकृत प्रत्यारोपणाच्या २९, मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या ४२ आणि हृदय प्रत्यारोपणाच्या २ शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. तसेच, आम्ही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तपासणी आणि मूल्यांकन करण्यासाठी स्पेशालिटी क्लिनिकच्या माध्यमातून यकृत प्रत्यारोपणाच्या सेवा उपलब्ध केल्या आहेत. यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांसह भागीदारीही केली आहे; जेणेकरून लोकांना प्रगत क्लिनिकल तज्ञ सेवा मिळू शकेल.

Popular posts
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
नवी मुंबईतील करावे गावात शेकडो अनधिकृत इमारतींचे बांधकामे सुरु ? बेलापूर विभाग कार्यालय व सिडकोचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? भूमाफियांनी अभय २५ ते ३० लाख रुपयांची प्रति इमारत सेटलमेंट, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर हातोडा
Image
नागरी सुविधा प्रकल्प कार्यान्वित करण्याप्रमाणेच महसूल वाढीवर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
Image