एकही हफ्ता न भरलेल्या गृहकर्ज अर्जदारांना ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ

नवी मुंबई - सिडको महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील घरांचे (सदनिकांचे) हफ्ते थकीत असणाऱ्या तसेच ज्यांनी घरांचा एकही हफ्ता भरलेला नाही, अशा अर्जदारांना उर्वरित हफ्ते भरण्याकरिता 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाच्या सर्वांसाठी घरे धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना 2018-19 अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोडमध्ये सुमारे 25,000 घरे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता साकारण्यात आली होती. 

          सदर योजनेची संगणकीय सोडत पार पडल्यानंतर, यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येऊन पात्र ठरलेल्या अर्जदारांना सदनिकेच्या किंमतीच्या रकमेचा ठराविक हफ्त्यांमध्ये भरणा करण्यासाठी वेळापत्रक देण्यात आले होते. परंतु तद्नंतर काही अर्जदारांनी एकाही हफ्त्याचा भरणा न केल्याचे तर काही अर्जदारांचे हफ्ते थकीत असल्याचे आढळून आले होते. सदर अर्जदारांच्या विनंतीवरून सदनिकेचे हफ्ते भरण्यासाठी 28 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या अंतिम दिनांकापर्यंतही काही अर्जदार हफ्ते भरण्यास असमर्थ ठरले होते.महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील काही अर्जदारांनी एकही हफ्ता न भरल्याचे तर काही अर्जदारांचे उर्वरित हफ्ते थकीत असल्याचे आढळून आले आहे.कोविड-19 मुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित अर्जदारांना थकीत हफ्ते भरण्याकरिता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महामंडळाच्या गृहनिर्माण योजनेतील तरतुदींनुसार विहित मुदतीत हफ्ते न भरणाऱ्या अर्जदारांचे वाटपपत्र रद्द होऊ शकते; परंतु कोविड-19 ची महासाथ व त्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच सदर योजनेतील सर्व अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणे, या बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सिडको महामंडळाने सदनिकेचा एकही हफ्ता न भरलेल्या आणि उर्वरित हफ्ते थकीत असणाऱ्या संबंधित अर्जदारांना हफ्ते भरण्याकरिता 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याच तसेच 25 मार्च 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत थकीत हफ्त्यांवर लागू होणारे विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अंतिम मुदतीपर्यंत संबंधित अर्जदारांनी थकित हफ्त्यांचा भरणा करावयाचा आहे. या निर्णयामुळे संबंधित अर्जदारांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.याकरिता संबंधित अर्जदारांनी सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या संकेस्थळास भेट देऊन, त्यावरील Online Payment या टॅबचा वापर करून आपल्या थकीत हफ्त्यांच्या संपूर्ण रकमेचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करावायाचा आहे. दिलेल्या मुदतवाढीचा संबंधित अर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

Popular posts
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
नवी मुंबईतील करावे गावात शेकडो अनधिकृत इमारतींचे बांधकामे सुरु ? बेलापूर विभाग कार्यालय व सिडकोचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? भूमाफियांनी अभय २५ ते ३० लाख रुपयांची प्रति इमारत सेटलमेंट, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर हातोडा
Image
नागरी सुविधा प्रकल्प कार्यान्वित करण्याप्रमाणेच महसूल वाढीवर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
Image