रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि.चे काम धोकादायक,मनपा आयुक्तांचे आदेश धाब्यावर

नवी मुंबई - रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. कंपनीच्या ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी नवी मुंबईच्या विविध भागात नवी मुंबई महानगरपालिकेकडून अटी व शर्तीच्या आधीन राहून खोदकाम करण्यास परवानगी देण्यात आली असता कंपनीकडून त्याचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे.केबल टाकण्यासाठी खोदलेले रस्ते गेल्या अनेक दिवसांपासून उघड्यावरच ठेवण्यात आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे या खड्यात पाणी साचले असून जर एखादा मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.तर मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकत्याच खोदकामासंदर्भात केलेल्या सूचनांनाही कंपनीने धाब्यावर बसवले असल्याचे दिसून आले आहे.

               शहराच्या विविध भागात रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि.कंपनीचे  ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सुरु असून त्या साठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करून फायबर केबल टाकण्यात येत आहेत.खोदकाम केलेल्या भागात मनपाकडून दोनच विद्युत केबलच्या वाहिन्यांसाठी परवानगी देण्यात आली असता कंपनीकडून तीन तीन वाहिन्या टाकण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.ज्या ठिकाणी खोदकाम केले आहे त्या संरक्षण कठडा बसवणे गरजेचेच असतांना कंपनीकडून त्या बाबतीत कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली दिसून येत नाही.त्यामुळे चालणाऱ्या आणि वाहनचालकांना या ठिकाणावरून चालणे धोकादायक ठरू लागले आहे.याचाच फटका एका वाहन चालकाला बसला असून त्याच्या वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.खोदकाम करण्यात आलेल्या खड्यातच वाहनाचे एक चाक अडकल्यामुळे वाहन बाहेर काढणे काही वेळ जिकरीचे झाले होते.जर वेळीच यावर मनपा कडून पावले उचलली न गेल्यास याचे गंभीर पडसाद उमटू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोट - रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि.च्या कामाबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांना उपअभियंता सुधाकर मोरे यांच्या माध्यमातून काम बंद करण्यास सांगण्यात आले आहेत.तर लवकरच त्यांच्याकडून खोदण्यात आलेले खड्डे ही भरून घेण्यात येतील. 

सचिन नामवाड - कनिष्ठ अभियंता ,नवी मुंबई महानगरपालिका  

Popular posts
नवी मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी की वसुली अधिकारी ?, एपीएमसी मधील मार्जिनल स्पेस धारकांकडून केली जाते ७ ते ८ लाखांची प्रतिमहिना वसुली ?, अधिकाऱ्यांकडून कारवाई कमी आणि सेटलमेंट जास्त होत असल्याची चर्चा ?
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
युवकांनो...“ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या..! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचे उद्घाटन संपन्न
Image
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image
*स्वच्छ सर्वेक्षणातील 'सुपर स्वच्छ लीग' या नव्याने समाविष्ट विशेष कॅटेगरीत, देशातील तीन शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश - महाराष्ट्रातील एकमेव शहर*
Image