नवी मुंबई - अग्निशमन विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंब नियम २००५ च्या शासन निर्णयाचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले असता या प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी राजे प्रतिष्ठान नवी मुंबई अध्यक्ष योगेश महाजन यांनी अग्निशनम प्रमुख शिरीष आराधवड यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.त्यावेळी ज्यांची ज्यांची नावे समोर आली आहेत त्या सर्वांची चौकशी करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले.त्यामुळे अग्निशमन विभागातील बहुतांश कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
एक पत्नी व मुलं असतांनाही दुसरे लग्न करून नवीन संसार थाटणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका अग्निशन विभागातील अधिकारी एकनाथ रूपा पवार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंब नियम २००५ च्या शासन निर्णयाचे उल्लंघन केले असल्याचे उघडकीस आले असल्याचे यापूर्वीच उघडकीस आले आहे.मात्र त्या नंतर अजून काही नावे अश्याच प्रकारची समोर आली आहेत.त्यांच्याकडून खुलासा करून घेणार असल्याची माहिती आराधवड यांनी दिली.कायद्याचे रक्षकच जर कायद्याचे भक्षक बनत असतील तर कायदा फक काय सामान्य नागरिकांनीच पाळायचा काय असा प्रश्न यावेळी महाजन यांनी उपस्थित केला.सदरील बाब ही गंभीर असल्याने अश्या अधिकाऱ्यावर तत्काळ बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी महाजन यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेशमध्ये ‘टू चाईल्ड पॉलिसी’ची घोषणा केली असून दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना ना नोकरी, ना भत्ता, ना निवडणुकीचं तिकीट या प्रकारची सक्ती करण्याकडे भर दिला आहे.योगी सरकारने या कडे आता लक्ष वेधले असतांनाच महाराष्ट्रात मात्र हा कायदा पूर्वीपासून लागू आहे.मात्र त्याकडे फारसे कुणाचे लक्ष नसल्यामुळे या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना बळ मिळाले आहे.योगी सरकारच्या कायद्याची चर्चा होत असतांनाच राज्यात नवी मुंबई अग्निशमन दलातील एका कर्मचाऱ्याने या कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे उघडकीस आले आहे.एकनाथ रूपा पवार हे अग्निशन सेवेत सहा.केंद्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या श्रीम.लीलाबाई एकनाथ पवार व सविता एकनाथ पवार अश्या दोन पत्नी आहेत.प्रथम पत्नीपासून त्यांना एक मुलगी तर दुसऱ्या पत्नीपासून त्यांना प्रियांका ,गौरी व वरून अशी तीन मुलं आहेत.अश्या प्रकारे एकनाथ पवार यांना दोन पत्नी व चार मुलं आहेत.आजमितीस पवार हे अग्निशन विभागाच्या निवासी इमारतीत राहत असल्याचे लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शासकीय अथवा प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम २००५ अंतर्गत परिवाराची माहिती देणे बंधनकारक आहे.या माहितीचे उल्लंघन करणारा अधिकारी अथवा कर्मचारी कार्यरत असेल तर त्याच्यावर बडतर्फ करण्याची तरतूद आहे.यानुसार पवार यांच्याकडून वरील कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.सदरील प्रतिबंध कायदा हा फोजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरत असल्याने प्रशासनाने तत्काळ गुन्हा नोंदवणे गरजेचे आहे,मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न करता नियमबाह्य काम करणाऱ्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे असे सांगण्यात येत आहे.यामुळे सदर प्रकरणाची दखल घेऊन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यावर बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजे प्रतिष्ठान नवी मुंबई अध्यक्ष योगेश महाजन यांनी लेखी निवेदनाच्या माध्यमातून मनपा आयुक्त अभिजित बांगर व अग्निशमन केंद्र प्रमुख शिरीष आराधवड यांच्याकडे केली आहे.
कोट - सहा.केंद्र प्रमुख एकनाथ रूपा पवार यांच्या माध्यमातून याच विभागातील ढोमणे, बाबर, चन्ने, सुर्वे यासह काही अधिकारीही यांची नावे समोर आली आहेत.त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्यात येईल.
शिरीष आराधवड - .केंद्र प्रमुख , अग्निशन विभाग