एलजीच्या मुंबई, ठाणे क्षेत्रातील ३९ व्या ब्रँड शॉपचे दिमाखात उद्घाटन, विरारमधील पहिलेच 'एलजी बेस्ट शॉप' ग्राहकांसाठी अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांची शृंखला

ठाणे : नवनवीन गॅजेट्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकप्रिय कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्सने विरार येथे त्यांच्या ३९ व्या ब्रँड शॉपचे उद्घाटन केले. विरारमधील हे पहिलेच 'एलजी बेस्ट शॉप' आहे. सध्याच्या अत्याधुनिक युगात ग्राहकांचा खरेदीचा अनुभव सुखकर, सुरळीत करत त्यांना आवडीची, उत्तम दर्जाची उत्पादने एकाच ठिकाणी घेता यावीत या उद्देशाने या शॉपची रचना करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स रिटेलमधील डॉ. हरिष मुलचंदानी आणि अमित मुलचंदानी यांच्या 'डिजी १, आपका इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर' या लिडिंग ग्रुप असणाऱ्या भागीदारसह 'एलजी बेस्ट शॉप' एम/एस डिजी १, बोळींज मार्ग, विरार (पश्चिम) येथे शॉपचे उद्घाटन एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या पश्चिम विभागाचे सेल्स प्रमुख सुरिंदर सचदेवा आणि प्रादेशिक व्यवसाय प्रमुख आरिफ खान यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सुप्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक आणि 'कोळीवूड प्रोडक्शन'चे संस्थापक प्रवीण कोळी यांची विशेष उपस्थिती होती. त्यांची अनेक गाणी लोकप्रिय ठरली असून 'गोव्याच्या किनाऱ्याव' या गाण्याला १९५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.देशभरातील विविध शहरांत एक्सक्लुसिव्ह प्रिमिअम शोरूम्सचा विस्तार करण्यावर एलजीचा भर आहे, जेणेकरून ग्राहकांना सर्वोत्तम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उत्पादने खरेदी करता येतील. ''नाविन्यता, गुणवत्ता आणि उत्कृष्टता या मूल्यांचा विचार करत आम्ही ग्राहकांसाठी उत्पादनांची निर्मिती करत आलो असून हे शॉप एलजी ब्रँडची मूल्ये दर्शविते. ग्राहकांसाठी उत्तमोत्तम सेवा प्रदान करणे हा आमचा मुख्य उद्देश असून त्यांचा आमच्या ब्रँडवर असणारा विश्वास फार मोलाचा आहे. त्यांच्या आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या लक्षात घेता आम्हाला आशा आहे की, एलजीची नाविन्यपूर्ण उत्पादने त्यांना निश्चित आवडतील आणि हे वर्ल्ड क्लास एलजी ब्रँड शॉप ग्राहकांना खरेदीचा सर्वोत्तम अनुभव देईल.'' असे एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या पश्चिम विभागाचे सेल्स प्रमुख सुरींदर सचदेवा म्हणाले."एक गायक असल्याने मला गॅजेट्स आणि टेक्नॉलॉजीची फार आवड आहे. 'एलजी बेस्ट शॉप'च्या उद्घाटन प्रसंगी मी टोनफ्री या भारतातील पहिल्या ९९.९ टक्के बॅक्टेरिया फ्री इअरबड्सचे उद्घाटन करत त्यांचा अनुभवही घेतला. आवाजाची उत्तम क्वालिटी असल्याने गाण्याचा आनंद अधिकच घेता आला. त्यामुळे गाण्यांची आवड असणाऱ्या प्रत्येकाला मी हे इअरबड्स वापरण्याचा सल्ला नक्कीच देईन.'' अशी भावना प्रवीण कोळी यांनी व्यक्त केली. 

Popular posts
अगोदर नोटीस, मग कारवाई, नंतर सेटलमेंट, इमारत पुन्हा उभी ? , तुर्भे विभाग कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात ? , तुर्भे विभाग अधिकारी व सिडको अधिकारी यांच्या भूमिकेवर संशय ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे दोन महिन्यात दोन मजले उभे ? , दोनदा कारवाई नंतर १५ लाख घेऊन बांधकामाला परवानगी दिल्याची चर्चा ? , दिवाळी अगोदर दोन मजले पूर्ण करण्याचे आदेश कोणाचे, सिडको चे मनपाचे ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image
अनधिकृत लॉजिंगमुळे शिरवणे गावाचे अस्तित्व धोक्यात, गावातील लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये वेश्याव्यवसाय, राहत्या इमारती मध्ये लॉजिंगचे अनधिकृत बांधकाम,अतिक्रमण विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?
Image
कोकणातील गणेशोत्सवावर कोरोनाच्या मर्यादा - राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना
Image