राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची नवी मुंबई, ठाणे , मुंबई कार्यकारिणी जाहीर ,प्रथमच महिला सुरक्षा रक्षक कमिटीची स्थापना

नवी मुंबई - शासकीय,निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्कासाठी स्थापन करण्यात आलेल्या राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची नवी मुंबई,ठाणे,मुंबई कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यावेळी सुरक्षा क्षेत्रात प्रथमच महिलांना कार्यकारिणीत स्थान देत महिलांच्या न्याय हक्कासाठी त्यांचीही नवी मुंबई कमिटी स्थापन करण्यात आली आहे.सुरक्षा सेवेत प्रथमच महिलांची कमिटी स्थापन करत एक नवीन व्यासपीठ तयार करण्यात आले असून या माध्यमातून यापुढे महिलांनाही न्याय मिळेल असे राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांनी सांगितले  

                सुरक्षा रक्षक मंडळातील वरिष्ठ सुरक्षकांकडून सुरक्षा रक्षकांना होणारा मानसिक ताण, वाढते वेटिंग, स्वार्थासाठी बँक टू बोर्ड त्याचबरोबर महिला कर्मचाऱ्यांबरोबर गैरवर्तणूक यावर कठोर पावले उचलण्यासाठी राजे प्रतिष्ठान कामगार सेना प्रणित राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची स्थापना करण्यात आली आहे.याच सेनेचा विस्तार करत शनिवारी सानपाडा येथे झालेल्या बैठकीत सुरक्षा रक्षक सेनेची नवी मुंबई, ठाणे , मुंबई कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यात सेनेच्या महाराष्ट्र सहसचिव पदी भाऊराव आसवले,नवी मुंबई अध्यक्ष पदी सुरेश पाटील,उपाध्यक्ष सुरेश चिंचोलकर,उपाध्यक्ष सुनील रांजणे,सचिव सचिन चिकणे,उप सचिव अनुप शिंदे, सदस्य सुंदर राठोड, अभिजित कांबळे, व अभिजित रणदिवे यांची निवड करण्यात आली तर महिला नवी मुंबई युनिट अध्यक्ष पदी मनिषा रोहम, उपाध्यक्ष गीता शेंडे, सचिव मीनाक्षी तारी, उपसचिव वैशाली नवले, सदस्य सरस्वती पवार व दीपाली वाघमारे यांची निवड करण्यात आली.ठाणे अध्यक्ष पदी विजय शंकर कवे व सचिव दादासो मोरे यांची निवड करण्यात आली तर मुंबई युनिट ची जबाबदारी सुनील पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.या पुढेही कार्यकारिणीची विस्तार करत लवकरच पुणे ,कोल्हापूर ,सांगली तसेच इतर ठिकाणीही युनिट स्थापन करण्यात येणार असल्याचे योगेश महाजन यांनी सांगितले. 

Popular posts
<no title>
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image
नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image