तळीये येथील बाधित बारा कुटुंबांना तात्पुरत्या निवासासाठी आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते कंटेनर सुपूर्द

अलिबाग - महाड तालुक्यातील तळीये येथील दरड कोसळल्यामुळे बाधित झालेल्या 12 कुटुंबांना तात्पुरत्या निवासाकरिता आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते कंटेनर सुपूर्द करण्यात आले.हे कंटेनर मिळण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी व विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या प्रयत्नातून नार्डेको कंपनी व मुंबईतील बिल्डर असोसिएशनमार्फत पुरविण्यात आले आहेत.

              या कंटेनरमध्ये किचन प्लॅटफॉर्म, टेबल व शौचालयाची सुविधा देण्यात आली आहे. येथे पाणीपुरवठा व कंटेनर उभे करण्यासाठी प्लॅटफॅार्म बनविण्याचे काम जिल्हा परिषद बांधकाम व पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले.हे तात्पुरते कंटेनर सुगंधचंद पोखरमल अग्रवाल यांनी तर योगीराज त्रिंबक चौधरी, सुंदराबाई भगवती माने, लक्ष्माबाई पांडुरंग माने, कृष्णाबाई गणपत पांडे या जमीन मालकांनी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित 12 कंटेनर लवकरात लवकर प्राप्त करून घेण्याचे  कामही प्रगतीपथावर आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळिजकर, पंचायत समिती सभापती सपना मालुसरे, तहसिलदार सुरेश काशीद, सरपंच संपत तांदळेकर, उपसरपंच महेंद्र म्हस्के, मंडळ अधिकारी जी.जी.पवार, तलाठी जगदिश शिंदे, ग्रामसेवक प्रविण शिंदे व तळीये ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts
अगोदर नोटीस, मग कारवाई, नंतर सेटलमेंट, इमारत पुन्हा उभी ? , तुर्भे विभाग कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात ? , तुर्भे विभाग अधिकारी व सिडको अधिकारी यांच्या भूमिकेवर संशय ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे दोन महिन्यात दोन मजले उभे ? , दोनदा कारवाई नंतर १५ लाख घेऊन बांधकामाला परवानगी दिल्याची चर्चा ? , दिवाळी अगोदर दोन मजले पूर्ण करण्याचे आदेश कोणाचे, सिडको चे मनपाचे ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image
अनधिकृत लॉजिंगमुळे शिरवणे गावाचे अस्तित्व धोक्यात, गावातील लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये वेश्याव्यवसाय, राहत्या इमारती मध्ये लॉजिंगचे अनधिकृत बांधकाम,अतिक्रमण विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?
Image
कोकणातील गणेशोत्सवावर कोरोनाच्या मर्यादा - राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना
Image