मुंबई :- अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडने २०२१ चाइम डिजिटल हेल्थ मोस्ट वायर्ड रेकग्निशन सर्टिफाईड लेवल ८ मिळवल्याची घोषणा द कॉलेज ऑफ हेल्थकेयर इन्फॉर्मशन मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह्जने केली आहे.लोकांचे आरोग्य आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या सेवासुविधा यामध्ये सुधारणा करण्यासाठी आरोग्यसेवा संस्था आपल्या क्लिनिकल व व्यवसाय कार्यक्रमांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानांना किती प्रभावीपणे उपयोगात आणतात याचे विश्लेषण करण्यासाठी चाइम डिजिटल हेल्थ मोस्ट वायर्ड प्रोग्रामकडून एक वार्षिक सर्वेक्षण केले जाते.
चाइम प्रेसिडेंट आणि सीईओ रसेल पी ब्रँझेल यांनी सांगितले, "२०२० पासून आरोग्यसेवा क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाने अभूतपूर्व वेग गाठला आहे आणि पुढील काही वर्षात या क्षेत्रात नाविन्याची मोठी लाट येईल जी आरोग्यसेवांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना अधिक सक्षम बनवेल आणि या उद्योगक्षेत्राचा आश्चर्यजनक विकास घडवून आणेल. ज्यांनी क्षेत्रात ही क्रांती घडवून आणण्याचा मार्ग खुला करवून दिला आहे अशा डिजिटल दिगज्जांचा सन्मान डिजिटल हेल्थ मोस्ट वायर्ड प्रोग्राममध्ये केला जातो."अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. संगीता रेड्डी यांनी सांगितले, "डिजिटल तंत्रज्ञानाने संशोधन आणि नावीन्यपूर्णता यांच्या बळावर आरोग्यसेवा क्षेत्रात प्रदान केल्या जाणाऱ्या सेवासुविधांमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे. आजच्या काळात आरोग्यसेवांमध्ये, खासकरून निवारक देखभाल आणि निरोगी राहण्याला प्रोत्साहन देण्यात एआय/एमएल आणि बिग डेटा हे अविभाज्य घटक बनले आहेत. सर्टिफाईड लेवल ८ म्हणून ‘२०२१ चाइम डिजिटल हेल्थ मोस्ट वायर्ड रेकग्निशन’ हा रुग्णांची देखभाल, गुणवत्ता आणि समाधान यांच्यात सुधारणा करण्यासाठी अधिक संचालनात्मक कार्यक्षमतांसह डिजिटल तंत्रज्ञानाचे लाभ घेण्यासाठी आमच्याकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा सन्मान आहे."२०२१ डिजिटल हेल्थ मोस्ट वायर्ड प्रोग्राममध्ये एकूण ३६,६७४ संघटनांचे प्रातिनिधीत्व करण्यात आले होते, यामध्ये चार स्वतंत्र सर्वेक्षणे आहेत: अक्यूट, ऍम्ब्युलेटरी, लॉन्ग-टर्म केयर आणि इंटरनॅशनल अक्यूट. या सर्वेक्षणांमध्ये सुरुवातीच्या विकासापासून उद्योगक्षेत्रात अग्रणी स्थानावर पोहोचेपर्यंत विकासाच्या सर्व टप्प्यांवर आरोग्यक्षेत्रातील संघटनांमध्ये तंत्रज्ञानांचा स्वीकार, एकात्मीकरण आणि प्रभाव यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघटनेला एक कस्टमाइज्ड बेंचमार्किंग रिपोर्ट, एकूण गुण आणि पुढील आठ विभागातील प्रत्येक पातळीसाठी गुण मिळतात: पायाभूत सोयीसुविधा, सुरक्षा, पुरवठा शृंखला, डेटा व्यवस्थापन, लोकांचे आरोग्य, रुग्णांना सामावून घेणे, संघटना या अहवालाचा आणि गुणांचा वापर करून बलस्थाने ओळखू शकतात व सुधारणेच्या संधी जाणून घेऊ शकतात. एकंदरीत कामगिरीनुसार सर्टिफिकेशन देखील देण्यात येते, यामध्ये लेवल १० हे सर्वात वरचे सर्टिफिकेशन आहे.