राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची राज्य कार्यकारिणी जाहीर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी विशाल नायकवडी, युवराज भक्ते तर विजय पाटील यांची महाराष्ट्र सचिव पदी निवड

राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची राज्य कार्यकारिणी जाहीर 
महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी विशाल नायकवडी, युवराज भक्ते तर विजय पाटील यांची महाराष्ट्र सचिव पदी निवड 
मुंबई अध्यक्ष - राजकुमार धनगर, नवी मुंबई अध्यक्ष - अनिल सनुगल्ले, ठाणे शहर अध्यक्ष :- रवींद्र जाधव

नवी मुंबई :- राज्यातील सुरक्षा रक्षकांच्या जनहितार्थ स्थापन करण्यात आलेल्या राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक व जनरल माथाडी कामगार सेनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी गुढीपाडवा या हिंदू नववर्षाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आली.यावेळी राज्य स्तरीय, मुंबई, नवी मुंबई, ठाणे व इतर शहरातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.तर ज्या इतर शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या बाकी आहेत त्याही लवकरात लवकर करून महाराष्ट्रात संघटनेची मोर्चेबांधणी करण्यात येईल असे यावेळी अध्यक्ष योगेश महाजन यांनी सांगितले.
              १५ ऑगस्ट रोजी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आल्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यास सुरवात करण्यात आली.त्यातच कोरोना महामारीचा अडसर आल्याने काही दिवस संघटनेचे कामकाज संथ गतीने सुरु होते.त्याही वेळी वेळोवेळी बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात वेळोवेळी प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा सुरूच राहिल्याने काही प्रश्न सोडवण्यात संघटनेला यश आले.यापुढे कामाची गती वाढवत राज्यातील १४ मंडळातील नोंदीत सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात येणार असल्याचे राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक व जनरल माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांनी सांगितले.गुढीपाडवा या हिंदू नववर्षाचे औचित्य साधून संघटनेच्या सानपाडा मुख्य कार्यालयात नवी मुंबई, मुंबई, ठाणे तसेच राज्य पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.या पदाधिकाऱ्यांना कामाच्या जबाबदाऱ्या देत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवुन घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी महाजन यांनी दिला.त्याचबरोबर जर कोणत्याही कामाचे खोटे आमिष दाखवून जर लुबाडत असतील तर त्याही पासून सावध राहा असा इशाराही यावेळी महाजन यांनी दिला.जाहीर करण्यात आलेल्या पदाधिकारी अथवा सदस्य यांच्याकडून एखाद्या सुरक्षा रक्षकाची दिशाभूल करण्यात आल्यास तत्काळ ८६८९८६१५४८ / ९३२१८०४४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान यावेळी महाजन यांनी केले.त्याचबरोबर पदाधिकारी व्यतिरिक्त जर कोणी वरील संघटनेच्या नावाने पदाधिकारी असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचीही माहिती तत्काळ वरील क्रमांकावर देणे बंधनकारक राहील अश्या सूचना करण्यात आल्या असल्याचे यावेळी महाजन यांनी सांगितले.

महाराष्ट्र उपाध्यक्ष :- विशाल भाऊ नायकवडी 
महाराष्ट्र उपाध्यक्ष :- युवराज श्यामराव भक्ते 
महाराष्ट्र सचिव - विजय पाटील 
महाराष्ट्र सहसचिव - भाऊराव आसवले  
मुंबई अध्यक्ष - राजकुमार धनगर
मुंबई उपाध्यक्ष  - विजय भंगाळे 
नवी मुंबई अध्यक्ष - अनिल सनुगल्ले
नवी मुंबई उपाध्यक्ष - सुरेश बबन पाटील 
नवी मुंबई उपाध्यक्ष - प्रमोद चंद्रकांत शिंदे 
नवी मुंबई उपाध्यक्ष - निलेश लांबाटे 
नवी मुंबई सचिव - विजय जाधव 
नवी मुंबई शहर कमिटी सदस्य :- प्रकाश भाष्ट्ये 
नवी मुंबई शहर कमिटी सदस्य :-  आनद डाकणे
नवी मुंबई शहर कमिटी सदस्य :-  संपत केरेकर 
नवी मुंबई शहर कमिटी सदस्य :-  सोमनाथ नायकवडी 
नवी मुंबई शहर कमिटी सदस्य :-  सुभाष पाटील 
नवी मुंबई शहर कमिटी सदस्य :-  विजय गोणपत 
ठाणे शहर अध्यक्ष :- रवींद्र जाधव 
ठाणे शहर उपाध्यक्ष :- विजय शंकर कवे 
ठाणे शहर उपाध्यक्ष :- दादासाहेब दत्तात्रय मोरे 
ठाणे शहर उपाध्यक्ष :- विकास शंकर ओंबळे 
ठाणे शहर उपाध्यक्ष :- पोपट जाधव 
ठाणे शहर उपाध्यक्ष :- जयवंत पाटील 
ठाणे शहर उपाध्यक्ष :- संतोष चव्हाण 
ठाणे शहर कमिटी सदस्य  :- महेश भोसले 
ठाणे शहर कमिटी सदस्य  :- उत्तम कोळेकर 
ठाणे शहर कमिटी सदस्य  :- सुभाष तोळसणकर
ठाणे शहर कमिटी सदस्य  :- राहुल भापकर 
ठाणे शहर कमिटी सदस्य  :- कल्पेश फडतरे 
ठाणे शहर कमिटी सदस्य  :- संजय पाटील  





Popular posts
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
नवी मुंबईतील करावे गावात शेकडो अनधिकृत इमारतींचे बांधकामे सुरु ? बेलापूर विभाग कार्यालय व सिडकोचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? भूमाफियांनी अभय २५ ते ३० लाख रुपयांची प्रति इमारत सेटलमेंट, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर हातोडा
Image
नागरी सुविधा प्रकल्प कार्यान्वित करण्याप्रमाणेच महसूल वाढीवर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
Image