एम आय डी सी तील रूपा इन्फोटेक अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा भूखंड पुन्हा वादात
त्या नियमबाह्य भूखंडाची नाशिकचे आमदार सरोज अहिरे यांच्याकडून चौकशीची मागणी
विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित
नवी मुंबई - महापे एमआयडीसी मधील रूपा इन्फोटेक अँण्ड इंफ्रास्ट्रक्चर प्रा.ली कंपनीला एमआयडिसीने नियमबाह्य पद्धतीने भूखंड वाटप केला असल्याचा ठपका ठेवत या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रकाशझोत सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील व सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार योगेश महाजन यांनी एमआयडीसी कार्यालयाकडे लेखी निवेदनाद्वारे दोन वर्षांपूर्वी केली आहे.त्या नंतर या विषयाचा पाठपुरावा करण्यात आला असता त्याला एमआयडीसी प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही.कोविड मध्ये या विषयाला संथ गती मिळाली असता पुन्हा एकदा आता या विषयाला पाटील व महाजन यांच्याकडून पाठपुरावा करण्यास सुरवात करण्यात आली आहे.त्यातच नाशिकचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सरोज अहिरे यांनी थेट हा विषय विधानभवनात उपस्थित केल्याने उद्योगमंत्री सुभाष देसाई यावर काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.
उद्योग विस्ताराच्या नावाखाली रूपा इन्फोटेक अँण्ड इंफ्रास्ट्रक्चर प्रा.ली कंपनीला सदरील भूखंड देण्यात आला असून त्या ठिकाणी उद्योग न करता युनिट ची खरेदी विक्री व पोटभाड्याने व्यवहार सुरु असल्याची माहिती प्राप्त झाल्याने आपण तत्काळ चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी पाटील व महाजन यांच्याकडून करण्यात आली होती.रूपा इन्फोटेक अँण्ड इन्फ्रास्टक्चर प्रा.ली यांना उद्योग विस्तार अंतर्गत महामंडळाने टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील एम.बी.पी जनरल ३१ क्षेत्र ८३०७ चौ.मी क्षेत्रफळाच्या भूखंड वाटपास मंजुरी दिलेली आहे.कंपनीने ने सादर केलेल्या प्रकल्प अहवालानुसार भूखंडावर आयटी /आयटीइस या प्रयोजनाकरिता जागेची मागणी केली आहे.या प्रकरणी महामंडळाच्या ०३.०६.२०१४ व २६.०९.२०१६ रोजी परिपत्रकान्वये भूखंड क्र.जनरल-३१ क्षेत्र ८३०७ चौ.मी. चे उद्योग विस्तारासाठी वाटप रूपा इन्फोटेक अँण्ड इन्फ्रास्टक्चर प्रा.ली यांना वाटपाबाबत निर्णय घेणेकरिता,भूखंड वाटप समितीच्या बैठकीत मंजुरी प्राप्त झालेली आहे.या बैठकीत डॉ. अनबलगन मुख्य कार्यकारी अधिकारी एम आय डी सी मुख्यालय आणि अविनाश सुभेदार तत्कालीन सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे असे कागदपत्रावरून निदर्शनास आले आहे. ज्याअर्थी उद्योग विस्ताराकरिता वाटप करावयाच्या भूखंडाचे बाबतीत परिपत्रकात नमूद केलेल्या मार्गर्दर्शक तत्वावर मूळ भूखंडावरील उद्योगाच्या विस्तारासाठी अतिरिक्त भूखंडाची मागणी करण्यात आली.परंतु ज्यावेळी अतिरिक्त भूखंडाची मागणी करण्यात आली त्यावेळी त्यात नियमबाह्य काम झालेले नसावे याची आपण चौकशी करणे ही प्रादेशिक अधिकारी यांची जबाबदारी आहे. त्यानुसार रूपा इन्फोटेक अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ली यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची तपासणी करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी १ यांच्याकडे अपूर्ण टिपण्णी प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांनी सादर केलेली आहे.सदर टिपण्णीत तपशिलानुसार अनुक्रमणिका २० मध्ये पोटभाडेकरू ठेवला आहे.असा अभिप्राय नमूद केलेले आहे.कंपनीने अर्जात नमूद केलेले रूपा इन्फोटेक अँण्ड इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा.ली टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील एमबीपी येथे भूखंड क्रमांक १ एरिया १६२७१.५८ चौ.मीटर बीयुए ६६२७१.५८ चौ.मी नावे असून औद्योगिक विस्तार अंतर्गत भूखंड क्रमांक जनरल -३१ क्षेत्र ८३०७ चौ.मी ची मागणी करताना अपूर्ण माहिती महामंडळाला दिलेली आहे. प्रत्यक्षात रूपा इन्फोटेक प्रा ली चा उद्योग कोणता आहे ज्या करीता उद्योग विस्तारा करिता अतिरिक्त भूखंडास ते महामंडळाच्या धोरणा नुसार कसे पात्र आहेत ही माहिती प्रादेशिक अधिकाऱ्याने अहवाल स्पष्टपणे टिप्पणीत जाणूनबुजून नमूद केलेली नाही. असा संशय प्रकाशझोत संघटनेने व्यक्त केला आहे.रूपा इन्फोटेक कंपनीने टीटीसी औद्योगिक क्षेत्रामध्ये एम.बी.पी.येथे भूखंड क्रमांक ए १ मधील भूखंडाचे डेव्हलपमेंट केल्यानंतर अनेक युनिटची विक्री केलेली असून युनिट पोटभाड्याने देखील दिलेली आहे असे समजले आहे.ज्याअर्थी महामंडळाचे परिपत्रकानुसार उद्योगविस्तार करण्यास जागेची आवश्यकता असल्यास विस्तार योजनेअंर्तगत अन्य भूखंड परिपत्रकानुसार देता येतो. परंतु सदर कंपनीने जर विकसित इमारती मधील युनिट पोटभाड्याने दिलेले असतील तर त्यांना उद्योग विस्तार अंतर्गत अन्य भूखंड देण्याचा प्रश्न उदभवत नाही.वास्तविक सदर कंपनी आय.टी.नियमानुसार उद्योग करीत नसून महामंडळाकडून भूखंड घेऊन प्रॉपर्टी डेव्हलप करणे व त्यानंतर युनिटची खरेदी विक्री करणे तसेच युनिट पोट भाड्याने देणे हा व्यवसाय करीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.प्रादेशिक अधिकारी यांनी अपूर्ण अहवाल दिलेला असून रूपा इन्फोटेक अँण्ड इन्फ्रास्टक्चर प्रा.ली याना उद्योग विस्तार अंतर्गत भूखंडाचे वाटप कोणत्या निकषाच्या आधारे केला आहे याबाबत खुलासा करावा.अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे प्रकाशझोत सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील व सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार योगेश महाजन यांनी एमआयडीसी प्रशासनाकडे केली असून त्यातच नियमांचे उल्लंघन करून भूखंड वाटप केल्याचे आढळल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा पाटील तसेच योगेश महाजन यांनी दिला आहे.