नवी मुंबई :- अनधिकृत बांधकाम होत असल्याची कल्पना देऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात घणसोलीतील आर टी आय कार्यकर्ते सचिन पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आली आहे.मनपा अधिकारी अनधिकृत बांधकाम होत असतांनाच केवळ कागदी घोडे नाचवून, वेळ मारून नेण्याचे काम करत असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.घणसोलीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरु असून त्यावर त्याची यादीही विभाग कार्यालयाकडून प्राप्त झाली असल्याची पाटील यांनी दिली आहे.
रबाळे प्रभाग क्रमांक 25 मधील गट क्रमांक २८/३ या जमिनीवर अनधिकृत बांधकाम होत असल्याची तक्रार सचिन पाटील यांनी २१/०५/२०२१ रोजी नवी मुंबई महापालिका आयुक्त व विभाग अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती.या ठिकाणी जी + ४ (चार मजली इमारत) चे सुरु असल्याचे त्यावेळी पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.त्यावर विभाग कार्यालयाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.काही दिवसांनी त्यांनी कारवाई संबधीची माहिती आर टी आय मार्फत मागितली असता त्यांना संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. यावर अजून पुढे जात कारवाई संदर्भात स्थानिक पोलीस ठाण्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्या ठिकाणीही त्यांना माहिती मिळण्यास विलंब झाला.वारंवार कारवाई साठी पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याने अखेर पाटील यांनी या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा देत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.यात प्रफुलता मनोज म्हात्रे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर,अतिरिक्त आयुक्त संजय काकडे,अतिक्रमण उपायुक्त अमरीश पटनिगिरी,विभाग अधिकारी,सिडको अधिकारी व महावितरण अधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.