नवी मुंबई :- शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचे जाळे तयार होत असल्याने त्याला नियंत्रणात आणण्यासाठी सिडकोने कारवाईचा धडाका लावला आहे.शहरातील अनेक अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवत असतांना अनेकांना नोटीस बजावण्याचे कामही सिडको कडून करण्यात येत आहे.याच धर्तीवर सानपाडा गावात अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास येताच सिडकोने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली.सानपाडा गावातील हेमंत विष्णू मढवी यांचे सर्व्हे क्रमांक १ व ५४ या जागेवर इमारतीचे काम सुरु होते.त्यावर ३० /०४ /२०२४ रोजी सिडकोकडून करण्यात आलेल्या स्थळ पाहणी दरम्यान निदर्शनास आले कि अंदाजे ६०.०० चौ.मी (अंदाजे) मापाचे R.C.C (G + २) चे बांधकाम हे अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे ०८ / ०५ / २०२४ रोजी हेमंत विष्णू मढवी यांना नोटीस बजावण्यात आली.सदर बांधकाम हे अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत मढवी यांना संबंधित कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.त्यामुळे आता या अनधिकृत इमारतीवर कारवाईची टांगती तलवार आहे.अनधिकृत होर्डिंग, अनधिकृत इमारती अथवा पब किंवा बार यांच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे आजमितीस अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. ज्यावेळी घटना घडतात त्यावेळी शासन ,प्रशासन यंत्रणा खळबळून जागी होते आणि कारवाया सुरु होतात.जरी कारवाया सुरु असल्या तरी अधिकारी हातचा राखून कारवाया करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे.नवी मुंबई शहरात बहुतांश अनधिकृत इमारती उभ्या राहत असून त्यावर विविध विभाग कार्यालयात तक्रारी प्राप्त आहेत.मात्र त्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना आर्थिक आशीर्वाद देण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरु असल्याचे दिसून येते.
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट