करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा
दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
नवी मुंबई :- दारावे गावातील सेक्टर २३ बालाजी अपार्टमेंट, प्लॉट नंबर C - १६ / ७-८ या इमारतीच्या बाजूलाच जी + १ अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु असल्याची बाब निदर्शनास येताच त्या बांधकामाची बातमी फोटोसह प्रखर लोकमान्य या वर्तमानपत्रात १३ ते १९ दरम्यानच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर बातमीची दखल घेत सिडकोकडून गुरुवारी या अनधिकृत इमारतीवर तोडकं कारवाई करण्यात आली.याच इमारतीवर या पूर्वीही तोडकं कारवाई करण्यात आली होती.त्यानंतर पुन्हा बांधकाम सुरु झाल्याने यावेळी सिडकोकडून मोठ्या प्रमाणत कारवाई करत संपूर्ण बांधकाम हटवण्यात आले आहे.
नवी मुंबईतील करावे गावातही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून त्यातील गणेश तलावासमोरील सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम धारक विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा पडणार असल्याची चर्चा सुरु आहे.यांच्याही इमारतीवर यापूर्वी तोडकं कारवाई करण्यात आली होती.त्यानंतर पुन्हा या विकासकांनी अनधिकृत बांधकामाला सुरवात केली आहे.हे दोघेही सिडको व महापालिका अतिक्रमण विभाग आपल्याच खिशात असल्यासारखे वागत असल्याने येत्या काही दिवसांतच त्यांच्या इमारतीवर हातोडा पडणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. २७ नोव्हेंबर रोजी करावे गावातील शांताराम महादू तांडेल, घर क्र. 839, करावे आणि सहदेव तुकाराम भोईर, करावे गाव तसेच संगिताबाई चंद्रकांत पाटील, घर क्र. 836, करावे यांच्यावर कारवाई करण्यात आली.मात्र मोठ्या इमारतींकडे ढुंकूनही बघण्यात आले नाही.करावे गावात बहुतांश प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत.करावे गावातील मनपा शाळेच्या आजूबाजूलाच जी + ३ ते ५ मजली अनेक इमारतींचे कामे सुरु आहेत.त्यानंतर तलावाच्या समोर जी + २ ते ४ मजली अनेक इमारतींचे कामे सुरु आहेत.स्मशान भूमीच्या बाजूला तर भूमाफियांनी टाऊनशिप सारखे अनधिकृत बांधकाम सुरु केले असून त्यावर सिडको अथवा मनपा कोणाचीही नजर जातांना दिसत नाही.पोद्दार शाळेच्या माघे तर अनधिकृत बांधकाम धारकांची स्पर्धाच लागली असून १५ ते २० जी + ४ ते ५ इमारतींची कामे सुरु असल्याची बाब निदर्शनास आली आहे.या सर्व प्रकरणांची माहिती दोन महिन्यांपूर्वी बेलापूर विभाग कार्यालय यांना देऊनही कारवाई झाल्याचे दिसून याले नाही.नेरुळ गावातील बालाजी मंदिराच्या माघील बाजूस भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु केली आहेत.सानपाडा गावातही ज्या अनधिकृत इमारतीवर सिडकोने कारवाई केली होती त्याच इमारती आता पुन्हा जोमाने उभ्या राहत आहेत. कोपरखैरणे मधील बोनकोडे गावातही दोन महिन्यांपूर्वी ज्या अनधिकृत इमारतीवर सिडकोने कारवाई केली होती तीच इमारत आता पुन्हा जोमाने उभी राहत आहे.तर मनपाच्या नागरी आरोग्य केंद्राच्या मोघेही मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे.अनधिकृत बांधकामे हा अधिकाऱ्यांसाठी एक एक्स्ट्रा इन्कम म्हणून भाग बनला असल्याने पैसे दिले तर ठीक नाहीतर कारवाई अशे प्रकार सध्या दिसून येत आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमन,१९६६ मधील कलमानुसार अनधिकृत बांधकाम / अतिक्रमणांवर नोटीस देऊन निष्कासनाची कारवाई करणे,निष्कासनाचा खर्च वसूल करणे,फौजदारी गुन्हे दाखल करणे, तसेच तद अनुषंगिक कारवाई करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्र १५५/२०११,दि ०९/१०/२०२४ अन्वये रस्ते,पदपथ तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत होर्डिंग,बॅनर्स / पोस्टर विशेष मोहीम घेऊन हटविण्याचे आदेशित केले आहे.तर विनापरवानगी बांधकामे करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमन,१९६६ चे कलम अन्वये व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.अश्या सूचना मनपा आयुक्त यांनी केल्या असून त्यांच्या सूचनांना पायदळी तुडवण्याचे काम आठही विभाग कार्यालयाकडून करण्यात येत आहे.