करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा

नवी मुंबई (योगेश महाजन) :- करावे गावातील सेक्टर ३६ मधील मुख्य रस्त्यालाच लागून असलेल्या ट्राय सिटी बिल्डिंग समोरील जी + ४ मजली अनधिकृत इमारत ही गेल्या अनेक दिवसांपासून उभी राहत असतांना बेलापूर विभाग कार्यालय व सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या निदर्शनास पडली नाही याचे आश्चर्यच मानावे लागेल.महत्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी या बिल्डिंगच्या बाजूलाच असलेल्या स्मशानभूमी जवळील अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली होती.त्यानंतर या इमारतीकडे कसे दुलर्क्ष झाले याचा शोध घेण्याची गरज असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.  

              करावे गावातील सेक्टर 36 मध्ये कै. सौ. गंगाबाई सदन, घर नं 873/2 या भूखंडावर गेल्या अनेक दिवसांपासून जी + ४ या अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु आहे.आजमितीस सदरील इमारत ९० टक्के पूर्ण होण्याच्या मार्गावर असून या इमारतीला अभय देण्यासाठी २५ ते ३० लाख रुपये देण्यात आले असल्याची चर्चा या परिसरात सुरु आहे.सदरील इमारत पूर्ण होत असतांनाच त्याच्या बाजूलाच अजून एका नवीन इमारतीचे बांधकाम सुरु झाले आहे तर ज्या स्मशानभूमी च्या जवळील अनधिकृत इमारतीवर तोडकं कारवाई करण्यात आली होती त्याचेही काम जोमाने सुरु झाले असल्याचे दिसून येत आहे.तो अनधिकृत बांधकामाचा भूखंड मोठ्या प्रमाणात त्यावर जास्त रकमेची सेटलमेंट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.२७ नोव्हेंबर रोजी करावे गावातील शांताराम महादू तांडेल, घर क्र. 839, करावे आणि सहदेव तुकाराम भोईर, करावे गाव तसेच संगिताबाई चंद्रकांत पाटील, घर क्र. 836, करावे यांच्यावर कारवाई करण्यात आली.मात्र मोठ्या इमारतींकडे ढुंकूनही बघण्यात आले नाही.करावे गावातील मनपा शाळेच्या आजूबाजूलाच जी + ३ ते ५ मजली अनेक इमारतींचे कामे सुरु आहेत.त्यानंतर तलावाच्या समोर जी + २ ते ४ मजली अनेक इमारतींचे कामे सुरु आहेत.स्मशान भूमीच्या बाजूला तर भूमाफियांनी टाऊनशिप सारखे अनधिकृत बांधकाम सुरु केले असून त्यावर सिडको अथवा मनपा कोणाचीही नजर जातांना दिसत नाही.ट्रायसिटी इमारतीच्या समोर अनेक अनधिकृत इमारतींची बांधकामे सुरु आहेत.पोद्दार शाळेच्या माघे तर अनधिकृत बांधकाम धारकांची स्पर्धाच लागली असून १५ ते २० जी + ४ ते ५ इमारतींची कामे सुरु असल्याची बाब निदर्शनास आली आहे.या सर्व प्रकरणांची माहिती दोन महिन्यांपूर्वी बेलापूर विभाग कार्यालय यांना देऊनही कारवाई झाल्याचे दिसून याले नाही.नेरुळ गावातील बालाजी मंदिराच्या माघील बाजूस भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु केली आहेत.


Popular posts
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
नवी मुंबईतील करावे गावात शेकडो अनधिकृत इमारतींचे बांधकामे सुरु ? बेलापूर विभाग कार्यालय व सिडकोचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? भूमाफियांनी अभय २५ ते ३० लाख रुपयांची प्रति इमारत सेटलमेंट, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर हातोडा
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image