तुर्भेतील अनधिकृत बांधकामे,झोपडपट्टी,हॉटेल्स व गॅरेज विरोधात धरणे आंदोलन, विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांच्याकडून कारवाई न झाल्याने धरणे आंदोलन, तुर्भे विभाग कार्यालयात कारवाई कमी वसुली जास्त,वसुली साठी मवाडे यांच्याकडून दोघांची नियुक्ती ?

नवी मुंबई (योगेश महाजन) :- तुर्भे विभाग कार्यालयातील सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांनी विभागाचा पदभार स्वीकारताच भ्र्रष्टाचाराला प्राधान्य दिल्याने अनेकांमध्ये नाराजी आहे.त्यातच वसुली साठी त्यांनी त्यांच्या मर्जीतील स्वतंत्र दोन व्यक्ती निवडल्याने मवाडे काम करण्यासाठी आले कि वसुली साठी अशी चर्चा विभाग कार्यालयात सुरु झाली.तक्रारदारांच्या तक्रारीला त्यांनी केराची टोपलीच दाखवल्याने अखेर न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न तक्रारदारांसमोर उपस्थित झाला आहे.त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारींचे निवारण न झाल्याने अखेर आंदोलनाचा इशारा देत नवी मुंबई विकास अधिष्ठानचे अध्यक्ष संकेत डोके यांनी ८ एप्रिल पासून नवी मनपा मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

              तुर्भे सेक्टर १९ परिसरातील अनधिकृत बांधकाम तसेच झोपडपट्टी वर कारवाई करण्यात यावी यासाठी दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी नागरिकांनी महापालिका विरुद्ध निषेध आंदोलन केले होते. या अनुषंगाने तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. असे असताना ९० दिवस लोटून गेले तरी अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.याबाबत संबंधित विभाग अधिकारी तसेच उपायुक्त अतिक्रमण विभाग यांचीही अकार्यक्षमता दिसून येत असल्याची खंत डोके यांनी व्यक्त केली आहे.तुर्भे सेक्टर १९ मधील वेअर हाऊस साठी असलेल्या जागेंवर लॉज व बार सुरु झाले असून त्यावर कारवाई करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे डोके यांनी अतिक्रमण विभागाकडे केली होती.त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने या विषयावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे ‘धरणे आंदोलन’ करणार असल्याची माहिती संकेत डोके यांनी दिली. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असून याप्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवल्यास यास संबंधित अधिकारी वर्ग जबाबदार राहील असे त्यांनी सांगितले.तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत परळी पॅटर्न राबवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे,या विभागात भ्र्रष्टाचार खुलेआम सुरु असून या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मुख्यालयातील आका कोण अशी चर्चा मनपा परिसरात सुरु आहे.यापूर्वीच तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील मार्जिनल स्पेस, बेसमेंट, अतिक्रमण घोटाळा समोर आला आहे.मनपा आयुक्त कैलास शिंदे यांच्या कारकिर्दीत भ्र्रष्टाचार वाढला असून भ्र्रष्टाचारी अधिकारी व त्यांच्या माध्यमातून होणार भ्र्रष्टाचार यावर नियंत्रण ठेवण्यात त्यांना अपयश आल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नवी मुंबई मनपाला एका चांगल्या आणि सक्षम मनपा आयुक्तांची गरज असल्याची चर्चा नवी मुंबई परिसरात सुरु आहे.तुर्भे सेक्टर १९ या परिसरामधील भूखंड एपीएमसी मार्केट संबंधित गतिविधींना जागे अभावी त्रास होऊ नये म्हणून वेअर हाऊस साठी भुखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परंतु गेले काही वर्षे भुखंड धारकांनी जास्तीचे पैसे कमवण्यासाठी या वेअर हाऊस च्या भुखंडांवर हॅाटेल,बार व लॅाज उभारण्यास सुरुवात केली. परिणामी आज मोठ्या संख्येने या परिसरात हॅाटेल,बार व लॅाज चे जाळे पसरले आहे. यातील अनेक बार व लॅाजमध्ये ए.पी.एम.सी. पोलिसांकडून अनैतिक धंदे होत असल्याचे निदर्शनास आल्यावर कारवाई झालेली आहे.तसेच तत्कालीन उपायुक्त राहुल गेठे यांनी त्यांचा अतिक्रमण विभागाचा पदभार स्वीकारल्यावर पहिली कारवाई या अनधिकृत हॅाटेल,बार व लॅाज वर केली होती.परंतु काही महिन्यातच पुन्हा मोठ्या ताकदीने हे हॅाटेल,बार व लॅाज सुरू आहेत. मुळात महापालिकेचे आरक्षित वेअर हाऊस वापरासाठी असेलेल्या भुखंडावर नियमानुसार वापर बदल न करता सुरू असलेले हे हॅाटेल,बार व लॅाज कसे कार्यरत आहेत हा सवाल नागरिकांच्या मनात उपस्थित झालेला आहे. तसेच या घटकांकडून सुरू असलेला अनैतिक व्यवसाय अर्थकारणासाठी पुरक असल्याने माहापालिकेकडून रेड कार्पेट टाकत यांना डोळेझाक करून अनधिकृत बांधकाम करण्याची मुभा देत असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. या व्यवसायिकांनी नियमबाह्य पद्धतीने केलेले अतिक्रमण भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडवू शकते. याच अनुषंगाने नवी मुंबई विकास अधिष्ठान चे अध्यक्ष संकेत डोके यांनी सेक्टर १९ ई येथील अनधिकृत बांधकाम केलेल्या हॅाटेल,बार व लॅाज चालकांची यादी आयुक्त व विभाग अधिकारी यांना निवेदन देऊन दिली आहे.एपीएमसी मार्केट मधील माथाडी मार्केट, ग्रोहीतंम मार्केट, जलाराम मार्केट, ग्रोमा मार्केट व मर्चंट चेंबर मार्केट मध्ये विविध प्रकारचे व्यापारी व्यापार करत असून या ठिकाणी शहरातीलच नव्हे तर इतर शहरातीलही नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात.नागरिकांना वस्तु खरेदी करतांना कोणताही त्रास होऊ नये अथवा त्यांना अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक दुकानाचा आजूबाजूला मार्जिनल स्पेस ठेवण्यात आले आहेत.मात्र याच मार्जिनल स्पेस चा व्यापाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वापर सुरु केल्याने त्यावर कारवाई होऊ नये म्हणून मनपा विभाग अधिकाऱ्यांना प्रति महिना ५ ते ६ लाखांचा मेवा देण्यात येत असल्याची चर्चा एपीएमसी परिसरात सुरु आहे.

बॉक्स - तुर्भे विभाग कार्यालयातील करार पद्धतीवरील कर्मचारी धनराज पवार व सुरक्षा रक्षक अमोल शेलार हे दोघेही तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांच्यासाठी कलेक्शन करत असल्याची चर्चा तुर्भे विभाग कार्यालयात सुरु आहे.याची मनपा आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी अनेकांकडून होत आहे.  



Popular posts
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
रिझर्व्ह बॅंक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ; , डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Image
नवी मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी की वसुली अधिकारी ?, एपीएमसी मधील मार्जिनल स्पेस धारकांकडून केली जाते ७ ते ८ लाखांची प्रतिमहिना वसुली ?, अधिकाऱ्यांकडून कारवाई कमी आणि सेटलमेंट जास्त होत असल्याची चर्चा ?
Image
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image